पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
Posted On:
28 JUL 2020 11:38PM by PIB Mumbai
“वाघ हा निसर्गाचा एक अतुलनीय घटक आहे आणि भारतातील वाघांची वाढती संख्या म्हणजे निसर्गाच्या योग्य संतुलनाचे प्रतिबिंबच आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला, आज नवी दिल्ली येथे त्यांनी व्याघ्रगणनेचा सविस्तर अहवाल प्रकाशित केला.
वाघ तसेच इतर वन्यजीवन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रदर्शित होणारी सॉफ्टपॉवरच आहे, असे जावडेकर म्हणाले. अनेक अडचणी ,बंधने असूनही कमी भूभाग प्रमाण असतानाही भारतात आठ टक्के जैवविविधता आहे. निसर्गाशी जुळवून घेण्याची आणि निसर्ग, वृक्षराजी, वन्यजीवन यांच्या रक्षणाची आपल्या देशातील आपली संस्कृती हे यामागील कारण आहे. आपली नैसर्गिक संपत्ती या वन्यजीवनाशिवाय दुसरी कोणती नाही. जगातील वाघांच्या एकूण संख्येच्या 70 टक्के व्याघ्रसंख्या भारतात आहे ही कौतुकाची गोष्ट असल्याचे सांगून ते म्हणाले, वाघांचे अस्तित्व असलेल्या इतर तेरा देशांसोबत भारत वाघांच्या संवर्धनासाठी अथक काम करत आहे.
India is proud of its tiger assets. The country today has 70% of world's tiger population. We are ready to work with all the 13 tiger range countries in their actual management of tiger reserves, etc: Union Minister @PrakashJavdekar #IndiasTigerSuccess pic.twitter.com/ZbPdNXwZ4W
— PIB India (@PIB_India) July 28, 2020
वन्यजीव आणि माणूस यांच्यामधील संघर्षाचे आव्हान तसेच त्यामुळे होणाऱ्या प्राणिहत्या टाळण्याच्या दृष्टीने वन्यजीवांना वनातच जल आणि भक्ष्य मिळावे यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने योजना आखण्याच्या प्रयत्नात आपले मंत्रालय असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. यासाठी LIDAR आधारित सर्वेक्षण तंत्रज्ञान प्रथमच वापरण्यात येणार आहे.LIDAR तंत्रज्ञान म्हणजे लेझर प्रकाशाच्या सहाय्याने लक्ष्याचा वेध घेऊन सेन्सरच्या सहाय्याने प्रतिबिंबाचा वेध घेत प्राण्याचे स्थान निश्चित करणे.
वाघ हा पर्यावरणाचा आधारस्तंभ आहे असे नमूद करत पर्यावरण मंत्र्यांनी एका पोस्टरचेही प्रकाशन केले. भारतातील जवळजवळ तीस टक्के वाघ हे व्याघ्र प्रकल्पात समावेश नसलेल्या प्रदेशात आढळून येतात. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील संवर्धन प्रक्रियेच्या व्याघ्र संवर्धन मानकांची नियमावली देशभरातल्या सर्व पन्नास व्याघ्र संवर्धन प्रकल्पांनाही लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या कार्यक्रमात बोलताना पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो म्हणाले, वन्य प्राणी आणि मनुष्य हा संघर्ष टाळता येऊ शकतो पण नाकारता येणार नाही. ते पुढे म्हणाले की, देशातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी या आघाडीवरच्या लोकांनी लक्षणीय प्रयत्न केले आहेत.
चौथ्या भारतीय व्याघ्र गणनेचा सविस्तर अहवाल खालील कारणांमुळे विशेष महत्वाचा आहे;
सह-भक्ष्यी आणि इतर प्रजातींचा विपुलता निर्देशांक नोंदवला गेला आहे. आत्तापर्यंत याची फक्त अधिवासापुरतीच मर्यादित नोंदणी होत होती.
गणनेसाठी कॅमेरा लावलेल्या सर्व स्थळांवर वाघांचे लिंग गुणोत्तर प्रथमच नोंदवण्यात आले आहे.
लोकसंख्येचे मानववंशशास्त्रीय परिणाम प्रथमच सविस्तर पद्धतीने मांडण्यात आले आहेत.
अभयारण्यातील वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये असलेल्या व्याघ्र संख्येची विपुलता प्रथमच प्रात्यक्षिक पद्धतीने दाखवण्यात आली आहे.
वाघाचे अस्तित्व असणाऱ्या देशांच्या सरकार-प्रमुखांनी सेंट पिट्सबर्ग रशिया येथे मान्यता दिलेल्या जाहीरनाम्यानुसार जगभरातील वाघांची संख्या 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्याचे या देशांनी ठरवले होते. या बैठकीदरम्यान 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचेही ठरवले होते. त्यानुसार जगभरात व्याघ्र संवर्धनासंबंधी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
जागतिक व्याघ्र दिन 2019 हा भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस होता. या दिवशी पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे व्याघ्र संवर्धनाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांनी देशभरातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट भारताकडून चार वर्ष आधीच गाठले गेले. भारतातील वाघांची संख्या आता 2967 झाली असून ती जगभरातील व्याघ्र संख्येच्या 70 टक्के एवढी आहे. भारतातील वन्यजीवांचे कॅमेरा मार्फत सर्वेक्षण जगभरातील सर्वात मोठे व्यापक सर्वेक्षण असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आज प्रकाशित करण्यात आलेला सविस्तर अहवाल वाघांच्या अधिवासात आढळणारी त्यांची संख्या आणि भारतभरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेली त्यांच्या संख्येची घनता यासंदर्भात सविस्तर विवरण मांडतो. पंतप्रधानांनी 2019 मध्ये भारतातील वाघांच्या सद्यस्थितीबद्दल मांडलेल्या अहवालाशिवाय, हा सविस्तर अहवाल गेल्या तीन सर्वेक्षणात (2006, 2010, and 2014) मिळालेल्या माहितीची तुलना 2018-19 च्या सर्वेक्षणाशी करत, भारतातील वाघांची अंदाजित संख्या मांडतो. याशिवाय उपलब्ध असणाऱ्या वनांची संख्या, एखाद्या ठिकाणी एकत्रितपणे आढळणाऱ्या वाघांची संख्या तसेच त्यांचे अस्तित्व नाहीसे होण्याचा दर या सगळ्यांची तुलना करत, वाघांच्या अधिवासाची दर शंभर किलोमीटरमागे बदलणारी स्थिती आणि त्याला जबाबदार असणारे घटक याची माहिती देतो. हा अहवाल, वाघांचे अधिवास जोडणाऱ्या मार्गिकांचेही पृथक्करण करतो. वेगवेगळ्या अधिवासातील मार्गिकांमध्ये आढळणारे वेगवेगळे धोकादायक पट्टे आणि त्याठिकाणी व्याघ्रसंरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीही अधोरेखित करतो. वाघ या भारतातील मुख्य मांसाहारी आणि शिकारी प्राण्याची संपूर्ण माहिती, देशभरातील त्याच्या संख्येची घनता आणि विपुलता यासंबंधीची सविस्तर माहिती हा अहवाल पुरवतो.
M.Iyangar/V.Sahajrao/P.Kor