संरक्षण मंत्रालय

संरक्षण खरेदी प्रक्रिया 2020 चा दुसरा मसुदा सार्वजनिक करण्यात आला असून  संबंधितांकडून मागवण्यात आल्या सूचना

Posted On: 28 JUL 2020 5:24PM by PIB Mumbai

 

संरक्षण खरेदी प्रक्रिया (डीपीपी ) 2020 चा दुसरा मसुदा, ज्याला ‘संरक्षण अधिग्रहण प्रक्रिया 2020’ असे शीर्षक देण्यात आले असून हा मसुदा संरक्षण मंत्रालयाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आला असून जनतेकडून आणि संबंधितांकडून  सूचना  मागवण्यात आल्या  आहेत.

(https://mod.gov.in/dod/sites/default/files/Amend270720_0.pdf).

डीपीपी 2020 चा पहिला मसुदा वेब होस्ट करण्यात आला होता आणि सूचना/ शिफारसी17  एप्रिल  2020 पर्यंत मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर यासाठी 8 मे 2020 पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. तेव्हापासुन विविध संबंधित, सेवा, उद्योग जगताकडून प्राप्त झालेल्या सूचना 10,000 पेक्षा जास्त पानांच्या  आहेत.

विविध एजन्सी कडून मिळालेल्या या सूचनांचे विश्लेषण केल्यानंतर संबंधीतांशी वैयक्तिक आणि वेब कॉन्फरन्स द्वारेही विशिष्ट संवाद साधण्यात आला ज्यायोगे त्यांच्या चिंतांची दखल घेणे शक्य होईल.

सुधारित दुसऱ्या मसुद्याला आढावा समितीने अंतिम रूप दिले असून आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून  जाहीर केलेल्या संरक्षण सुधारणाविषयक  तत्व लक्षात घेऊनच अंतिम रूप दिले आहे.

पुन्हा एकदा सुधारित मसुद्यावर  विशिष्ठ सूचना 10 ऑगस्ट 2020 पर्यंत मागवण्यात आल्या आहेत.

****

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641822) Visitor Counter : 236