आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात एकाच दिवसात सर्वाधिक 4.2 लाखाहून अधिक कोविड चाचण्या


आतापर्यंत सुमारे 1.6 कोटी नमुन्यांची तपासणी

मृत्यू दरात मोठी घट होऊन 2.35%

Posted On: 25 JUL 2020 4:52PM by PIB Mumbai

 

भारतात पहिल्यांदाच 4,20,000पेक्षा जास्त अशा सर्वाधिक कोविड चाचण्या एकाच दिवसात करण्यात आल्या.गेल्या 24 तासात 4,20,898 नमुने तपासण्यात आले, दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या चाचण्यांच्या संख्येत वाढ होऊन आता ही संख्या 11,485  झाली असून एकूण चाचण्यांची संख्या  1,58,49,068 झाली आहे. दोन्हीतही सातत्यने वाढ दिसत आहे.

प्रयोगशाळांच्या संख्येत सातत्याने वाढ  होत असल्यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. 2020 च्या जानेवारीत एक प्रयोगशाळा होती आता ही संख्या 1301 झाली आहे. यामध्ये 902 सरकारी तर 399 खाजगी प्रयोग शाळांचा समावेश आहे. चाचण्यांसाठी आयसीएमआर कडून सुधारित मार्गदर्शक तत्वे आणि सरकारकडून होणारे सर्वतोपरी प्रयत्न यामुळे चाचण्यांची व्यापकता वाढण्यासाठी मदत झाली आहे.

केंद्र सरकारने  सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना  तपासणी, शोध आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना केल्या असून त्याबरोबरीने चाचण्याही मोठ्या प्रमाणात करण्याचे धोरण अवलंबावे असे सांगितले आहे. यामुळे सुरवातीला रुग्णांची संख्या वाढलेली दिसली तरी त्यानंतर ती हळूहळू घटत जाईल, दिल्ली , राष्ट्रीय  राजधानी क्षेत्रामध्ये केंद्र सरकारच्या लक्ष्य केन्द्री प्रयत्नामुळे याची प्रचीती आली आहे.

सर्वंकष प्रमाणित देखभाल दृष्टिकोनावर आधारित प्रभावी आणि प्रमाणित वैद्यकीय व्यवस्थापन नियमामुळेमृत्यू दरात घट होत  आहे याचाच अर्थ केंद्र आणि राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नातून कोविड- 19 मृत्यू दर कमी होत आहे. आज हा दर 2.35% आहे. भारतातला मृत्यू दर हा जगातल्या सर्वात कमी मृत्यू दरापैकी एक आहे. 

गेल्या 24 तासात 32,223 कोविड रुग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 8,49,431झाली. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 63.54%. झाला आहे.  बरे झालेले आणि सक्रीय कोविड-19 रुग्ण यांच्यातले  अंतर वाढून  3,93,360 झाले आहे.

 कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्वे,आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/   आणि @MOHFW_INDIA.

कोविड-19 शी संबंधित तांत्रिक विचारणा technicalquery.covid19[at]gov[dot]in  यावर तर इतर मुद्दे ncov2019[at]gov[dot]in  आणि @CovidIndiaSeva  यावर पाठवू शकता.

कोविड-19 संदर्भात काही शंका असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा.. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf   वर उपलब्ध आहे.

 

D.Wankhede/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1641195) Visitor Counter : 190