आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ धोरणानुसार परीक्षण प्रयोगशाळांच्या प्रमाणात वाढ
आतापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त नमुन्यांचे परीक्षण
Posted On:
24 JUL 2020 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2020
कोरोना विषाणू संसर्गाचे निदान करण्यासाठी देशभरात आतापर्यंत दीड कोटीपेक्षा (1,54,28,170) जास्त नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत अशा 3,52,801 नमून्यांचे परीक्षण करण्यात आले.
ही आकडेवारी लक्षात घेता भारतात आजवर प्रती दशलक्ष 11,179 चाचण्या केल्या गेल्या असून परीक्षणाच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

परीक्षणासाठी प्रयोगशाळांच्या संख्येत करण्यात येणारी वाढ (आतापर्यंत 1290) तसेच विविध पर्यायांच्या माध्यमातून परीक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांनी हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे भारतात प्रति दशलक्ष चाचण्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आरटी-पीसीआर प्रयोगशाळा, या आयसीएमआरने अलिकडेच निर्धारित केलेल्या परिक्षण धोरणाचा कणा आहेत. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळांच्या संख्येत वाढ दिसून येते आहे. सध्या 897 सरकारी तर 393 खाजगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. याचे तपशील पुढीलप्रमाणे:
• रिअल टाईम आरटी-पीसीआर आधारित परिक्षण प्रयोगशाळा: 653 (सरकारी: 399 + खाजगी: 254)
• TrueNat आधारित परिक्षण प्रयोगशाळा: 530 (सरकारी: 466 + खाजगी: 64)
• CBNAAT आधारित परिक्षण प्रयोगशाळा: 107 (सरकारी: 32 + खाजगी: 75)
कोवीड–19 संबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि सल्ले याबाबत विश्वासार्ह आणि अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA येथे नियमितपणे संपर्क साधा.
कोवीड – 19 संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in येथे पाठवता येतील आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva येथे पाठवता येतील.
कोवीड – 19 बाबत कोणतेही प्रश्न असल्यास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हेल्पलाईनवर +91-11-23978046 अथवा 1075 (टोल फ्री) संपर्क साधा. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील कोवीड-19 संबंधित हेल्पलाईनची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf येथे उपलब्ध आहे.
* * *
M.Chopade/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1640956)
Read this release in:
Assamese
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu