रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एच -सीएनजी चा समावेश वाहनांचे इंधन म्हणून करण्याबाबत रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जनतेकडून मागवल्या सूचना
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2020 1:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2020
हायड्रोजनने समृद्ध केलेल्या सीएनजी चा समावेश वाहनांसाठी इंधन म्हणून करण्याबाबत सर्व जनतेकडून तसेच हितधारकांकडून रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सूचना व टिप्पणी मागवल्या आहेत.
या संबंधात केंद्रीय मोटार वाहन नियम 1979 मध्ये दिनांक 22 जुलै 2020 च्या शासकीय नियम 461(E) अन्वये सुधारणा सुचवणाऱ्या पत्रकाचा मसुदा सादर केला आहे.
देशात वाहनांसाठी हरित इंधन वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने मंत्रालयाचे हे आणखी एक पाऊल आहे.
यासंबंधात सूचना तसेच टिप्पणी, पत्रक काढल्यापासून 30 दिवसांच्या आत पुढील पत्त्यावर पाठवता येतील.
सह सचिव(MVL),
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय,
वाहतूक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली- 110001.
इ मेल : jspb-morth[at]gov[dot]in
U.Ujgare/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1640611)
आगंतुक पटल : 203