जलशक्ती मंत्रालय
जल जीवन अभियान: अन्य राज्यांच्या विकासासाठी राज्यांची परस्परांमध्ये स्पर्धा
7 राज्यांनी 2020-21 च्या उद्दिष्टाच्या 10% पेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य केले
Posted On:
21 JUL 2020 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2020
ऑगस्ट 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या जल जीवन अभियानाच्या 2019-20 मधील 7 महिन्यांत, सुमारे 85 लाख ग्रामीण कुटुंबांना नळ जोडण्या देण्यात आल्या. तसेच कोविड-19 महामारी दरम्यान, अनलॉक-1 पासून आतापर्यंत 2020-21 मध्ये सुमारे 55 लाख नळ जोडणी देण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे दररोज सुमारे 1 लाख घरांना नळ जोडण्या दिल्या जात आहेत.
आज पर्यंत 7 राज्ये - बिहार, तेलंगणा, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि मिझोरम यांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या घरगुती नळ जोडण्यांपैकी 10% पेक्षा जास्त उद्दिष्ट गाठले आहे.
देशातील 18.93 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 4.60 कोटी (24.30%) कुटुंबांना यापूर्वीच नळ जोडणी देण्यात आली आहे. सर्व नळ जोडण्याची कार्यक्षमता सुनिश्चित करताना उर्वरित 14.33 कोटी कुटुंबांना कालबद्ध रीतीने नळ जोडण्या देण्याचे उद्दीष्ट आहे. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन, राज्ये / केंद्रशासित प्रदेश दररोज एक लाखाहून अधिक जोडण्या या दराने नळ जोडण्या प्रदान करत आहेत.
2020-21 मध्ये जेजेएमच्या अंमलबजावणीसाठी 23,500 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. पुढे 15 व्या वित्त आयोगाच्या अनुदानाच्या 50% म्हणजे 30,375 कोटी रुपये ग्रामीण स्थानिक संस्थांना पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसाठी देखील राखीव ठेवण्यात आले आहेत. या रकमेपैकी 50% रक्कम यापूर्वीच राज्यांना देण्यात आली आहे, ज्यामुळे लोकांना नियमित आणि दीर्घ कालावधीत पिण्यायोग्य पाणी मिळवून देण्यासाठी खेड्यांमधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यंत्रणेची उत्तम अंमलबजावणी, परिचालन आणि देखभाल करण्यात मदत होईल.
देशातील प्रत्येक ग्रामीण घरात 2024 पर्यंत नळ जोडणीद्वारे नियमित आणि दीर्घ-मुदतीच्या आधारावर पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे या उद्देशाने जलशक्ती मंत्रालय राज्यांच्या भागीदारीने जल जीवन अभियान (जेजेएम) राबवत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील आर्थिक समावेशकता, घरे, रस्ते, स्वच्छ इंधन, वीज आणि शौचालये यासारख्या सुविधा देऊन ग्रामीण भागात राहणीमानात सुधारणा करण्याच्या आवाहनाच्या अनुषंगाने, जल जीवन अभियान प्रत्येक ग्रामीण घरात पिण्याचे पाणी पुरवत आहे यामुळे ग्रामीण लोकांचे विशेषत: महिला आणि मुलींचे जीवन सुधारेल आणि त्यांना कष्टातून तसेच पाण्यातून होणाऱ्या आजारांपासून वाचवेल.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1640319)
Visitor Counter : 308