गृह मंत्रालय
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून शोक व्यक्त
लालजी यांचे पूर्ण जीवन जनसेवेसाठी समर्पित होते- अमित शहा
लालजी टंडन यांनी आपल्या जीवनात विविध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या, त्यांच्या निधनामुळे झालेली हानी भरून निघू शकणार नाही - अमित शहा
एका जनसेवकाच्या रूपामध्ये लालजी टंडन यांनी भारताच्या राजकारणावर आपला अमिट ठसा उमटवला - अमित शहा
केंद्रीय गृह मंत्री शहा यांनी लालजी टंडन यांच्या कुटुंबियांविषयी सहसंवेदना व्यक्त करून दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2020 2:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. यावेळी ते म्हणाले, लालजी यांचे संपूर्ण जीवन जनसेवेसाठी समर्पित होते. एका जनसेवकाच्या रूपामध्ये लालजी टंडन यांनी भारताच्या राजकारणावर आपला अमिट ठसा उमटवला आहे.
लालजी टंडन यांनी आपल्या जीवनात विविध क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या, त्यांच्या निधनामुळे देशाची झालेली हानी कधीही भरून निघू शकणार नाही, असे गृह मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
यावेळी शहा यांनी लालजी टंडन यांच्या कुटुंबियांविषयी सहसंवेदना व्यक्त करून दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली.
* * *
U.Ujgare/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1640183)
आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam