पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या इंडिया आयडियाज समिटला संबोधित करणार

Posted On: 21 JUL 2020 1:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जुलै 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी इंडिया आयडियाज समिट येथे मुख्य भाषण करणार आहेत.

अमेरिका-भारत व्यापार परिषद या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. यावर्षी परिषदेच्या स्थापनेचा 45 वा वर्धापन दिन आहे. ‘चांगल्या भविष्याची निर्मिती’ ही यंदाच्या इंडिया आयडिया समिटची संकल्पना आहे.

या आभासी परिषदेमध्ये भारतीय आणि अमेरिकन सरकारचे धोरणकर्ते, राज्यस्तरीय अधिकारी आणि व्यवसाय आणि समाज क्षेत्रातील विचारवंत नेते यांची वैशिष्ट्यपूर्ण उपस्थिती असणार आहे. शिखर परिषदेच्या इतर प्रमुख वक्त्यांमध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपिओ, व्हर्जिनियाचे सिनेट सदस्य आणि सिनेट इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष मार्क वॉर्नर, संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांचा समावेश आहे. शिखर परिषदेत भारत-अमेरिका सहकार्यासह आणि जगभर पसरलेल्या महामारी पश्चात उभय देशांमधील भविष्यातील संबंध यासह इतर विषयांवर चर्चा होईल.

 

* * *

U.Ujgare/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1640158) Visitor Counter : 217