आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

गेल्या 24 तासांत 23,600 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले


बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 3 लाखांहून अधिक

प्रति मिलियन चाचण्या (टीपीएम)  10,000 च्या आसपास

Posted On: 19 JUL 2020 7:56PM by PIB Mumbai

 

चाचण्यांचे वाढते प्रमाण आणि वेळेवर निदान करण्याच्या केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या सक्रिय उपाययोजनांमुळे बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यात मदत झाली आहे. उत्तम प्रकारे अंमलबजावणी झालेल्या दर्जेदार सेवांच्या प्रोटोकॉलद्वारे मध्यम आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनामुळे कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या  24 तासात 23,672 इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यांच्यातील अंतर वाढून 3,04,043.इतके झाले आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 6,77,422 इतकी आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 62.86%.आहे.

एकूण  3,73,379 रुग्णांवर रुग्णालयात आणि घरी विलगीकरणात उपचार सुरु आहेत.

देशात चाचणी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.  आयसीएमआरच्या चाचणी धोरणानुसार कोविड चाचणीसाठी शिफारस करण्याची  सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे. आरटी-पीसीआर सह रॅपिड एन्टीजिन पॉइंटऑफ केअर टेस्टिंग मुळे देशात कोविड चाचण्यांना मोठी  गती मिळाली आहे. गेल्या 24 तासात 3,58,127 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यन्त एकूण 1,37,91,869  चाचण्या झाल्या असून देशात दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण 9994.1.वर पोहचले आहे.

सातत्याने वाढणाऱ्या निदान प्रयोगशाळा नेटवर्कमध्ये  1262 प्रयोगशाळाचा समावेश आहे, ज्यात सरकारी क्षेत्रातील 889 आणि 373 खासगी प्रयोगशाळा आहेत.

रिअल टाइम, आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 648 (सरकारी -397 अधिक खासगी 251)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: : 510  (सरकारी -455अधिक खासगी 55)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा:104 (सरकारी - 37 अधिक खासगी  67).

कोविड-19 विषयीच्या सर्व तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्वे तसेच सल्ला यासाठी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला नियमित भेट द्या.: https://www.mohfw.gov.in/  आणि @MoHFW_INDIA.

कोविड-19 विषयीच्या तांत्रिक प्रश्नांची, शंकाची उत्तरे हवी असतील तर पुढील ई-मेलवर विचारणा करावी. technicalquery.covid19[at]gov[dot]in

इतर शंकाविषयी  ncov2019[at]gov[dot]in  आणि  @CovidIndiaSeva.

कोविड-19 संदर्भात काही शंका असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  वर उपलब्ध आहे.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1639840) Visitor Counter : 242