आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील सक्रिय कोविड – 19 रुग्णसंख्या 3,31,146


एकूण रुग्णसंख्येपैकी सक्रिय रुग्णसंख्या एक तृतीयांश

6.1 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले

Posted On: 16 JUL 2020 6:01PM by PIB Mumbai

कोविड – 19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्य सरकार /केंद्रशासित प्रदेशांसह ``संपूर्ण सरकार`` द्वारा रणनिती अंतर्गत एक श्रेणीबद्ध प्रतिबंधात्मक, कार्यक्षम दृष्टीकोन स्वीकारला गेला आहे. सामूहिक प्रयत्नांचे उच्च स्तरावर नियमितपणे पुनरावलोकन केले जाते आणि त्यांचे परीक्षण केले जाते.

याबाबतीत लक्ष्य केल्या गेलेल्या उपायांमुळे सक्रिय प्रकरणांच्या संख्येत निरंतर घट होण्यास हातभार लावण्यात आला आहे. आजच्या तारखेला, देशभरामध्ये कोविड – 19 चे सक्रिय रुग्ण  3,31,146 इतके आहेत.  हे आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी एकतृतीयांश पेक्षा थोडे जास्त (34.18 टक्के) प्रमाण आहे. रुग्णसंख्येचा प्रभाव अधिक असलेल्या परिसरांमध्ये प्रतिबांत्मक उपाययोजना, घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण, क्षेत्रीय नियंत्रण उपाययोजना, संपर्कात आलेल्या व्यक्ती वेळीच ओळखणे, प्रभावी रुग्णसंख्या असलेल्या परिसरात सर्वेक्षण करणे, प्राधान्याने चाचणी, वेळेत झालेले निदान आणि रुग्ण बरे करण्यामध्ये परिणामकारक प्रयोगशालेय व्यवस्थापन यामुळे वास्तविक देशात कोविड – 19 ची रुग्णसंख्या ही मर्यादित राहिली आहे आणि व्यपस्थापन करण्यायोग्य आहे आणि रुग्णाची काळजी घेण्यातील नियमांचे काटेकोर पालन झाल्यामुळे रुग्णांची बरे होण्याची शक्यता देखील वाढली आहे.   

राज्य आणि केंद्र शासित प्रदेश आणि केंद्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे चाचणी क्षमता वाढविली, आरोग्य विषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ, एसएआरआय किंवा आयएलआय सारख्या रुग्णांबाबत प्राधान्याने सर्वेक्षण, आणि वृद्ध लोक आणि सहरोगी या लोकांचा शोध सुनिश्चित केल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये रुग्ण बरे होण्याच्या दराम्ये वाढ झाली आहे.

आलेखामध्ये दाखविल्यानुसार, जून 2020 च्या मध्यापासून 50 टक्के बरे होण्याचा दर पार केल्यानंतर, रुग्णांच्या बरे होण्यात सातत्याने वाढ झालेली दिसून येते आणि सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे. एकूण कोविड – 19 रुग्णांपैकी 63.25 टक्के  रुग्ण पूर्वीच बरे झाले आहेत, त्या बरोबरीने सक्रिय रुग्णांमध्ये स्थिरपणे उतार दिसतो, तो साधारणपणे जून 2020 च्या मध्यापासून 45 टक्के होता तो आतापर्यंत साधारणपणे 34.18 टक्के आहे.

एकूण 6,12,814 रुग्णांपैकी गेल्या 24 तासात 20,783 रुग्ण  कोविड – 19 मधून बरे झाले आहेत. कोविड – 19 चे सक्रिय रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यामधील अंतर आता 2,81,668 इतके झाले आहे.

कोविड – 19 साठी समर्पित असलेल्या रुग्णालयांपैकी दर्जा एक असलेली 1381 रुग्णालये आहेत, 3100 कोविड आरोग्य केंद्रे दर्जा दोन मध्ये कोविड साठी समर्पित आहेत, तर 10,367 कोविड आरोग्य केंद्र हे दर्जा तीनमध्ये आहेत. या दोन्हीमध्ये अतिदक्षता विभागात 46,666 खाटांची सुविधा आहे.

केंद्र आणि राज्ये यांच्या सहकार्याने केलेल्या धोरणानुसार हे देखील सुनिश्चित झाले आहे की कोविड रुग्णांच्या संख्येवर आता प्रतिबंध येत आहे. देशभरातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येपैकी 48.15 टक्के सक्रीय रुग्ण महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यात  आहेत. एकूण 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील केवळ 10 राज्यात देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 84.62 टक्के हिस्सा आहे. केंद्र सरकार या राज्यांना बाधित व्यक्तींच्या नियंत्रण आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या बाबतीत सतत सहकार्य करीत आहे.

कोविड – 19 संदर्भआत कोणतीही।अधिकृत आणि ताजी आकडेवारी /माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघावयाच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www/mojfw.gov.in   आणि @MoHFW_INDIA.  तांत्रिक बाबींच्या माहितीसाठी technicalquery.covid17[at]gov[dot]in   यावर मेल पाठवू शकता आणि अन्य माहितीसाठी Ncov2019[at]gov[dot]in   @CovidIndiaSeva  या वर संपर्क साधता येईल.

कोविड – 19 संदर्भात काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : +91-11-23978046  या हेल्पलाइनवर किंवा 1075 या टोल फ्री क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronavariushelplinenumber.pdf   या वर उपलब्ध आहे.

….

S.Tupe/S.Shaikh/P.Kor


(Release ID: 1639105) Visitor Counter : 312