पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'इंडिया ग्लोबल विक 2020'मध्ये उद्‌घाटनपर भाषण देतील


30 देशातील 5000 हून अधिक सहभागींना पंतप्रधान संबोधित करतील

Posted On: 08 JUL 2020 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जुलै 2020

इंडिया ग्लोबल विक 2020च्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्‌घाटनपर भाषण करणार आहेत. बी द रिव्हायवल - इंडिया अँड ए बेटर न्यू वर्ल्ड या तीन दिवसांच्या आभासी परिषदेमध्ये इंडिया ग्लोबल वीक 2020 मध्ये 30 राष्ट्रांमधील जागतिक स्तरावरील 5000 स्पर्धक सहभागी होणार आहेत; ज्यात विविध 75 सत्रांमध्ये जागतिक स्तरावरील 250 वक्ते भाषण करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अन्य उच्च वक्त्यांमध्ये केंद्रिय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल, जम्मू-काश्मिरचे लेफ्टनंट जनरल जी. सी. मुर्मु, ईशा फाउंडेशनचे संस्थापक, सद्‌गुरु, अध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर, युकेच्या परराष्ट्र सचिव डॉमनिक राब, गृहसचिव प्रीती पटेल, अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर आणि इतर मान्यवरांचा समावेश आहे.

यामध्ये आज पर्यंत न पाहिले गेलेले आत्मनिर्भर भारत यावर मधुनटराजन यांचे सादरीकरण आणि सतार वादक रविशंकर यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली म्हणून खास त्यांच्या तीन विद्यार्थ्यांकडून श्रद्दांजलीपर कार्यक्रम होणार आहे.

 

S.Pophale/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1637355) Visitor Counter : 193