मंत्रिमंडळ

सार्वजनिक क्षेत्रातल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या तीन जनरल विमा कंपन्यांमध्ये भांडवल घालायला केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी

Posted On: 08 JUL 2020 7:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जुलै 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी,(ओआयसीएल), नॅशनल इन्शुरन्स कंपनी (एनआयसीएल) आणि युनायटेड इंडिया  इन्शुरन्स कंपनी (युआयआयसीएल) या तीन जनरल विमा कंपन्यांमध्ये, 12,450 कोटी रुपयांचे ( 2019-20 या वित्तीय वर्षात घातलेल्या 2500 कोटी रुपयांसह)  भांडवल घालायला मंजुरी देण्यात आली. यापैकी 3,475 कोटी रुपये भांडवलीकरण तातडीने  करण्यात येईल तर उर्वरित  6475 कोटी रुपयांचे भाडवलीकरण नंतर  करण्यात येईल.

भांडवल घालण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाने एनआयसीएलचे अधिकृत भाग भांडवल 7500 कोटी, युआयआयसीएल आणि ओआयसीएलचे 5000 कोटी पर्यंत वाढवायला मंजुरी दिली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सध्या विलीनीकरण प्रक्रिया थांबवण्यात आली असून  त्या ऐवजी त्यांच्या लाभदायी विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

3,475 कोटी रुपयांचे भांडवल एनआयसीएल, युआयआयसीएल आणि ओआयसीएल या तीन सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्यांना  पहिला टप्पा म्हणून चालू वित्तीय वर्षात दिले जाईल. उर्वरित रक्कम एक किंवा दोन टप्यात दिली जाईल. भांडवल घालण्याच्या दृष्टीने एनआयसीएलचे अधिकृत भाग भांडवल 7500 कोटी, युआयआयसीएल आणि ओआयसीएलचे 5000 कोटी पर्यंत वाढवले  जाईल.

प्रभाव:

भांडवल घातल्यामुळे, या तीन सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्याना आपली वित्तीय आणि ऋणविषयक स्थिती सुधारण्यासाठी  अर्थव्यवस्थेच्या  विमा विषयक गरजांची पूर्तता, बदल आत्मसात करण्यासाठी  आणि संसाधने उभारण्याची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापन सुधारण्यासाठी मदत होणार आहे. 

वित्तीय परिणाम:

चालू वित्तीय वर्षात एनआयसीएल, युआयआयसीएल आणि ओआयसीएल या तीन सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्यांना  पहिला टप्पा  दिला जाणार असल्याने तातडीने  होणारा वित्तीय परिणाम 3,475 कोटी रुपये राहील. 6,475 कोटी रुपये त्यानंतर जारी करण्यात येतील.

पुढचा मार्ग :

पुरवण्यात येणाऱ्या भांडवलाचा  सर्वोत्कृष्ट उपयोग व्हावा या दृष्टीने केंद्र सरकारने केपीआयच्या रूपाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत, व्यवसाय  कार्यक्षमता आणि लाभदायी वृद्धी आणण्याचा यामागचा उद्देश आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सध्या विलीनीकरण प्रक्रिया थांबवण्यात आली असून  भांडवल घातल्यानंतर  त्यांच्या ऋणविषयक स्थिती  आणि  लाभदायी विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637344) Visitor Counter : 192