Posted On:
07 JUL 2020 6:06PM by PIB Mumbai
जागतिक आरोग्य संघटनेचा 6 जुलै 2020 चा स्थिती अहवाल दर्शवितो की दहा लाख लोकसंख्येमागे कोविड -19 चे सर्वात कमी रुग्ण असलेल्यांपैकी भारत एक आहे. भारताचा दर 505.37 प्रति दहा लाख लोकसंख्या आहे तर जागतिक सरासरी 1453.25 आहे.
चिलीमध्ये कोविड -19 चे दहा लाख लोकसंख्येमागे 15,459.8 रुग्ण आढळले आहेत, तर पेरू, अमेरिका, ब्राझील आणि स्पेनमध्ये दहा लाख लोकसंख्येमागे हा दर अनुक्रमे 9070.8, 8560.5, 7419.1 आणि 5358.7 रुग्ण इतका आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा स्थिती अहवाल असेही दर्शवितो की दहा लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. भारतातील दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण 14.27 आहे तर जागतिक सरासरी चार पटीपेक्षा अधिक म्हणजेच 68.29. इतकी आहे.
ब्रिटनमध्ये कोविड -19 संबंधित मृत्यूचा दर दहा लाख लोकसंख्येमागे 651.4 रुग्ण आहे तर स्पेन, इटली, फ्रान्स आणि अमेरिकेत हे प्रमाण अनुक्रमे 607.1, 576.6, 456.7 आणि 391.0 इतके आहे.
रुग्णांचे प्रभावीपणे आणि पुरेशा प्रमाणात व्यवस्थापन करण्यासाठी भारताने रुग्णालय संबंधी पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली. ऑक्सिजन आधार, आयसीयू आणि व्हेंटिलेटर सुविधांचा या सज्जतेत समावेश होता. 7 जुलै 2020 पर्यंत, अति गंभीर तसेच अत्यंत सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रूग्णांची देखभाल करण्यासाठी 1201 समर्पित कोविड रुग्णालये, 2611 समर्पित कोविड आरोग्यसेवा केंद्र आणि 9909 कोविड केअर सेंटर आहेत. अशा प्रकारच्या सज्जतेमुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने सुधारणा झाल्याचे तसेच मृत्युदर कमी राहिल्याचे दिसून आले आहे.
कोविड 19 रुग्णांचे लवकर निदान आणि वेळेवर प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे रुग्ण बरे होण्याचे रोजचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासांत एकूण 15,515 रुग्ण बरे झाले असून कोविड -19 रुग्णांपैकी बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आतापर्यन्त 4,39,947 इतकी झाली आहे.
कोविड-19 ला प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यासाठी राष्ट्रीय आणि राज्य सरकारच्या सर्व स्तरांवरील समन्वित प्रयत्नांमुळे बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण (अॅक्टिव्ह) यामधील अंतर सातत्याने वाढत असून उत्साहवर्धक परिणाम दिसून येत आहेत. आजच्या तारखेला कोविड -19 च्या सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे झालेल्यांची संख्या 1,80,390 ने अधिक आहे. कोविड -19 बाधित रुग्ण बरे होण्याचा दर आज वाढून 61.13% झाला आहे.
सध्या 2,59,557 रुग्णांवर उपचार सुरु असून सर्व वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
चाचणी, शोध , उपचार ” वर वाढता भर, विविध उपाययोजनांमध्ये वाढ यामुळे राज्ये / केंद्रशासित प्रदेशांद्वारे व्यापक प्रमाणात कोविड 19 ची चाचणी सुलभ केली आहे. यामुळे दररोज 2 लाखाहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत. गेल्या 24 तासांत 2,41,430 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. या वाढीमुळे कोविड -19 साठी देशभरात आतापर्यंत 1,02,11,092 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.
चाचणी प्रयोगशाळेचे नेटवर्क निरंतर विस्तारत आहे ज्यात विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील वाढत्या प्रयोगशाळा जोडल्या जात आहेत. सरकारी क्षेत्रात 793 प्रयोगशाळा आहेत तर 322 खासगी प्रयोगशाळा असून देशात एकूण 1115 प्रयोगशाळा आहेत.
या आहेत-
रियल-टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 598 (सरकारी:372 + खाजगी: 226 )
TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 423 (सरकारी: 388 + खाजगी: 35)
CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 94 (सरकारी: 33 + खाजगी: 61)
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva.
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com