आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी स्थिती


राष्ट्रीय स्तरावर रुग्ण कोविड पॉझिटिव्ह होण्याचा दर 6.73%, अनेक राज्यांमध्येही कोविड पॉझिटिव्ह होण्याचा दर कमी

केंद्राच्या प्रयत्नांमुळे दिल्लीत चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ, रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर घटला

Posted On: 06 JUL 2020 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली,  6 जुलै 2020


देशात, कोविड-19 संक्रमणाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश एकत्रित काम करत आहेत.  

या एकत्रित प्रयत्नांचा भाग म्हणून, केंद्र सरकारने चाचण्यांमध्ये वाढ केली असून, कोविड रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि योग्य वेळेत रुग्णांवर उपचारांचे व्यवस्थापन केले जात आहे. केंद्र सरकारने राज्यांनाही चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी मदत केली आहे.

या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून, देशातील रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर आता कमी झाला आहे. राष्ट्रीय स्तरावर हा सरासरी दर आता 6.73टक्के इतका आहे.

5 जुलै 2020 रोजी, देशातील,सरासरी दरापेक्षा पॉझिटिव्ह रुग्णांचा दर कमी असलेली राज्ये, आणि राष्ट्रीय दरापेक्षाप्रती दशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात राष्ट्रीय सरासरीपेक्षा चाचण्यांचे प्रमाण अधिक असलेली राज्ये खालीलप्रमाणे:   

अनुक्रमांक

राज्य

पॉझिटिव्ह रुग्णदर टक्केवारीत

चाचण्‍या प्रति दशलक्ष

1

भारत(राष्ट्रीय)

6.73

6,859

2

पुद्दुचेरी

5.55

12,592

3

चंदिगढ

4.36

9,090

4

आसाम

2.84

9,987

5

त्रिपुरा

2.72

10,941

6

कर्नाटक

2.64

9,803

7

राजस्थान

2.51

10,445

8

गोवा

2.5

44,129

9

पंजाब

1.92

10,257

 

दिल्लीत, केंद्रशासित सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारने मोठे पाठबळ दिले आणि चाचण्यांच्या संख्येत वाढ होईल, याकडे लक्ष दिले. RT-PCR चाचण्यांची संख्या वाढवली गेली, त्यासोबतच, नव्या रॅपिड अँटिजेन पॉईंट ऑफ केअर चाचण्याही सुरु करण्यात आल्या. या चाचण्यांचा रिपोर्ट केवळ 30 मिनिटात कळू शकतो.  

केंद्र सरकारच्या या सुनियोजित आणि लक्ष केंद्रित करुन केलेल्या प्रयत्नांमुळे, आधी दिल्लीत ज्या दररोज केवळ 5481 चाचण्या (1 ते 5 जून दरम्यान) केल्या जात होत्या, त्यांच्यात नंतर  लक्षणीय वाढ होऊन, आता एक महिन्यानंतर, म्हणजेच 1 ते 5 जुलै या दरम्यान दररोज सरासरी 18,766 चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊनही, दिल्लीतील रुग्ण पॉझिटिव्ह निघण्याचा दर मात्र कमी झाला असून गेल्या तीन आठवड्यात हा दर 30 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.


* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636798) Visitor Counter : 210