आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कर्नाटक "आशा": सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या खऱ्या चैतन्याचे प्रदर्शन


42000 आशा सेविकांनी केला सुमारे 1.59 कोटी कुटुंबांचे 'व्हलनरेबिलिटी मॅपिंग सर्वे'

Posted On: 03 JUL 2020 3:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली,  3 जुलै 2020


अन्नपूर्णा ही कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील टुंगानगरमध्ये कार्यरत एक "आशा" सेविका आहे. जेव्हा शहरी "आशा" सेविकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक भाग म्हणून ओळख प्राप्त झाली, तेव्हापासून म्हणजेच 2015 पासून अन्नपूर्णा ही 3000 लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टी भागात काम करत आहे. कोविड-19 उपक्रमांचा एक भाग म्हणून तिच्याकडील सर्वात महत्वपूर्ण काम म्हणजे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे.

कर्नाटकातील 42,000 "आशा" सेविका कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील राज्य सरकारच्या यशाचे मुख्य आधारस्तंभ म्हणून समोर आल्या आहेत. या आशा सेविका कोविड-19 घरगुती सर्वेक्षणात सक्रियपणे भाग घेत असून कोविड-19 च्या लक्षणांसाठी आंतर राज्य प्रवासी, स्थलांतरीत मजूर व समुदायातील इतरांची तपासणी देखील करत आहेत. विशिष्ट लोकसंख्या गटातील कोविड-19ची वाढती असुरक्षितता लक्षात घेऊन, वृद्ध नागरिकांसह सह-आजारी आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी या आशा सेविकांनी घरोघरी जाऊन 1.59 कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण केले आहे. आशा सेविका त्यांच्या विभागातील अशा उच्च-जोखमीच्या गटांवर नियमितपणे देखरेख ठेवतात व नियमितपणे त्यांचा पाठपुरावा करतात, प्रतिबंधित क्षेत्रात दिवसातून एकदा तर, इतर भागात 15 दिवसातून एकदा भेट देतात. त्या इली/सारीची लक्षणे असलेल्या आणि राज्य आरोग्य विभागाच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल केलेल्या उच्च-जोखमीच्या व्यक्तींच्या घरांना देखील भेट देतात.

विशेष म्हणजे, या आशा सेविका कोविड-19 आणि बिगर कोविड-19 अशा दोन्ही बाबींसंबंधित जनतेच्या तक्रारी दूर करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन करण्यात आलेल्या ग्रामीण कृती दलाचा एक भाग आहेत. शहरी भागात 'फीव्हर क्लिनिक' आणि 'स्वॅब' संकलन केंद्रांमध्ये विविध जागरूकता उपक्रमांचा प्रसार करण्यासाठी शहरी आशा आघाडीवर आहेत. त्यांनी शहरातील इली आणि सारी तापाच्या रुग्णांची सक्रियपणे तपासणी केली आहे. या आशा सेविका आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय टोल नाक्यावरील तपासणी टीमचा देखील एक भाग आहेत.

कर्नाटक मधील एक झलक: कोविड-19 विरुद्ध काम करणाऱ्या "आशा" सेविका

  
   
* * *

S.Pophale/S.Mhatre/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1636140) Visitor Counter : 302