आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविडविषयी अद्ययावत माहिती


केंद्रीय पथक गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणला भेट देणार

75 लाखाहून अधिक चाचण्या

रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन आता दर 57.43 %

Posted On: 25 JUN 2020 5:21PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक गुजरात,महाराष्ट्र आणि तेलंगणला 26-29 जून 2020 दरम्यान भेट देणार आहे. हे पथक राज्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड-19 व्यवस्थापना बाबत सुरु असलेले प्रयत्न बळकट करण्यासाठी समन्वय साधेल.

देशभरात चाचणी सुविधात लक्षणीय वाढ करत, भारतात आता 1007 निदान प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 734 सरकारी क्षेत्रातल्या तर 273 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

याचा तपशील याप्रमाणे आहे-

  • जलद आरटी पीसीआर आधारित निदान प्रयोगशाळा : 559 (सरकारी: 359 +खाजगी: 200)
  • ट्रू नॅट आधारित निदान प्रयोगशाळा: 364 ( सरकारी :343 +खाजगी: 21 )
  • सीबीएनएएटी आधारित निदान प्रयोगशाळा : 84 ( सरकारी:32+ खाजगी :52 )

जानेवारी 2020 मधल्या मर्यादित चाचण्यावरून आता गेल्या 24 तासात 2,07,871चाचण्या करण्यात आल्या, त्यामुळे चाचण्यांची संख्या आता 75 लाखाहून अधिक होत 75,60,782 झाली आहे.

गेल्या 24 तासात 13,012 कोविड-19 रुग्ण यातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण  2,71,696 रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले आहेत. कोविड-19 मधून रुग्ण बरे होण्याचा दर आता 57.43 %  झाला आहे.  

सध्या  1,86,514 सक्रीय रुग्ण असून हे सर्व रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

भारतात सध्या प्रती लाख लोकसंख्येमध्ये 33.39 रुग्ण असून जागतिक स्तरावर हे प्रमाण लाखभर लोकसंख्येत 120.21 रुग्ण आहे. देशात लाखामागे मृत्यूचे प्रमाण  1.06 असून जगातल्या कमी मृत्यू प्रमाणात याचा समावेश आहे,जागतिक स्तरावर हे प्रमाण लाखामध्ये सरासरी 6.24 मृत्यू इतके आहे.

कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक तत्वे,आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/  आणि @MOHFW_INDIA.

कोविड-19 शी संबंधित तांत्रिक विचारणा  technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर मुद्दे ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड-19 संदर्भात काही शंका असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधा.. कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  वर उपलब्ध आहे.

 

S.Tupe/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1634277) Visitor Counter : 226