Posted On:
22 JUN 2020 5:12PM by PIB Mumbai
प्रति लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी रुग्णसंख्या असणाऱ्या जगातील देशांमध्ये भारताचा समावेश असून बरे होणारे आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत दिवसेंदिवस वाढत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या 21 जून, 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या 153 व्या परिस्थिती अहवालानुसार भारतात लोकसंख्येची घनता जास्त असूनही प्रति लाख लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी असणाऱ्या देशांपैकी हा देश आहे. भारतात प्रति लाख लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण 30.04 आहे तर जागतिक सरासरी त्याच्या तिप्पटीपेक्षा जास्त म्हणजे 114.67 आहे. अमेरिकेत प्रति लाख लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण 671.24 रुग्ण आढळतात तर जर्मनी, स्पेन आणि ब्राझीलमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 583.88, 526.22 आणि 489.42 आहे.
ही रुग्णांची कमी आकडेवारी म्हणजे कोविड -19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसह भारत सरकारच्या श्रेणीबद्ध, पूर्व-प्रभावी आणि प्रतिबंधात्मक सक्रिय दृष्टिकोनाचे फलित आहे.
आत्तापर्यंत कोविड-19 चे एकूण 2,37,195 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 9,440 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर 55.77%पर्यंत पोहोचला आहे.
सध्या 1,74,387 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. कोविड-19 चे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील फरक सातत्याने वाढत असून तुम्ही तो खाली दिलेल्या आलेखावर पाहू शकता. बरे झालेले रुग्ण हे सक्रिय रुग्णांपेक्षा 62,808 ने जास्त आहेत.
कोविड-19 च्या चाचणी पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 723 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 262 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे एकूण 985 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:
जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 549 (शासकीय: 354 + खाजगी: 195)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 359 (शासकीय: 341 + खाजगी: 18)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 77 (शासकीय: 28 + खाजगी: 49)
एकूण तपासलेल्या नमुन्यांच्या संख्येचा विचार करता दररोज तपासणी होणाऱ्या नमुन्यांच्या संख्येत नियमित वृद्धी होत आहे. गेल्या 24 तासात 1,43,267 नमुने तपासण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत 69,50,493 नमुने तपासण्यात आले.
कोविड -19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.
कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.
कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com