पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

बागजन वायू गळती आग दुर्घटना - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि अमेरिकच्या ऊर्जा विभागादरम्यान चर्चा

Posted On: 13 JUN 2020 8:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2020

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑईल इंडिया लिमिटेड आणि ओएनजीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक , आपत्ती व्यवस्थापन दल आणि इतर तज्ञांबरोबरच अमेरिकेच्या उर्जा विभागाच्या (डीओई) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच तेल आणि वायू आपत्ती नियंत्रणावरील अमेरिकन तज्ञांशी 12 जून 2020 रोजी आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील  बागजन येथील ऑईल इंडिया लिमिटेड (ओआयएल) च्या वायू विहिरीत वायू गळती आणि भडकलेल्या आगीवर  नियंत्रण मिळवण्याबाबत सविस्तर चर्चा केली. सिंगापूरमधील परदेशी तज्ञही या बैठकीला उपस्थित होते.

अमेरिकेत वायू गळतीच्या अशाच प्रकारच्या घटना घडल्या असतानाचा अनुभव अमेरिकेने सांगितला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बागजन येथे सुरू असलेल्या प्रयत्नांचे सर्व पैलू तसेच विहिरीतील गळती रोखण्याच्या तयारीसह आग व्यवस्थापन, जल व्यवस्थापन यंत्रणा, ढिगारा  हटविणे, ड्रोनसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी उपाययोजनांची माहिती भारताकडून देण्यात आली. अमेरिकेचा ऊर्जा विभाग आणि तज्ञांनी ओआयएल आणि ओएनजीसी तज्ञांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना आणि आगीवर तसेच विहिरीतील गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आखलेल्या योजनांचे समर्थन केले. येत्या काही दिवसांत पुन्हा दोन्ही बाजूंनी विचारांची देवाण घेवाण करण्याबाबत आणि विहिरीतील गळतीवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या भारत-अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारीचा भाग म्हणून या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1631492) Visitor Counter : 139