PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 13 JUN 2020 7:35PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 13 जून 2020

 

 

Text Box: ●	Recovery rate touches 49.95%, as 154330 Covid-19 patients have got cured so far- 7135 in last 24 hours.●	Testing capacity for detecting the novel Coronavirus is continuously being ramped up- 885 labs are doing the test.●	An updated clinical management protocol for COVID-19 released.●	Aarogyapath, a web-based solution for the healthcare supply chain, launched to provide real-time information on the availability of critical supplies.

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

कोविड -19 महामारीविरोधात भारताच्या प्रतिसादाबद्दल आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत महामारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावरील स्थिती व तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत दिल्लीसह विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरचे महासंचालक आणि अधिकारप्राप्त  गटांचे अन्य संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

नीती आयोगाचे सदस्य आणि वैद्यकीय आपत्कालीन व्यवस्थापन योजनेच्या अधिकारप्राप्त गटाचे संयोजक डॉ. विनोद पॉल यांनी मध्यम मुदतीत कोविड -19 प्रकरणांची सद्यस्थिती व संभाव्य परिस्थिती याबद्दल सविस्तर सादरीकरण केले. असे आढळून आले आहे की एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश हे पाच राज्यांमधील असून मोठ्या शहरांमधील रुग्णांचे प्रमाण प्रचंड आहे. विशेषत: मोठ्या शहरांद्वारे येत असलेल्या आव्हानांचा विचार करता, दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी चाचणी तसेच खाटांची संख्या वाढवणे आणि सेवा यावर चर्चा झाली.

पंतप्रधानांनी शहर आणि जिल्हावार  रुग्णालयामधील खाटा/ अलगीकरण खाटा यांची आवश्यकता याविषयी अधिकारप्राप्त समूहाच्या शिफारशींची दखल घेतली आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांशी सल्लामसलत करून आपत्कालीन नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना दिले. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या तयारीची खात्री करण्याचा सल्लाही त्यांनी मंत्रालयाला दिला.

राजधानीतील कोविड -19 साथीच्या सद्य आणि संभाव्य परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली आणि पुढील 2 महिन्यांतील संभाव्य स्थितीवर विचारविनिमय करण्यात आला.

राजधानीतील कोविड -19 साथीच्या सद्य आणि उदयोन्मुख परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली आणि पुढील 2 महिन्यांतील संभाव्य स्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. पंतप्रधानांनी सुचवले की कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाचे आव्हान पेलण्यासाठी समन्वित आणि सर्वसमावेशक योजना आखण्यासाठी   भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ; गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्याशी  समन्वय साधण्यासाठी तातडीची बैठक बोलवावी.

या महामारीच्या प्रादुर्भावाचा यशस्विरीत्या प्रतिबंध करून तो नियंत्रित करण्यात अनेक राज्ये, जिल्हे आणि शहरे यांनी उत्कृष्ट काम केल्याची बरीच उदाहरणे असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. इतरांना प्रेरणा आणि नाविन्यपूर्ण कल्पना देण्यासाठी या यशोगाथा आणि उत्तम पद्धतींचा व्यापकपणे प्रसार केला गेला पाहिजे असे ते म्हणाले.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

गेल्या 24 तासात देशभरात कोविडचे 7,135 रुग्ण उपचारानंतर बरे झाले. यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,54,329 इतकी झाली आहे. कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 49.95% इतका आहे. सध्या देशभरात 1,45,779 सक्रीय रुग्ण असून त्या सर्वांवर उपचार सुरु आहेत.

आयसीएमआर ने कोविड रुग्ण चाचणी क्षमता सातत्याने वाढवत नेली आहे. सध्या देशभरात 642 सरकारी आणि 243 खाजगी (एकूण 885) प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 च्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. गेल्या 24 तासात देशात, 1,43,737 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत, देशात कोविडच्या एकूण 55,07,182 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

नव्या प्रोटोकॉलनुसार, कोविड-19 च्या रूग्णांची स्थिती, त्यांना जाणवणारी लक्षणे, सौम्य, मध्यम अथवा गंभीर स्वरूपाची आहेत, का हे तपासून, त्यानुसार, वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापन केले जात आहे. संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणाच्या पद्धती देखील रुग्ण या तीनपैकी कोणत्या पातळीवर आहे, हे तपासून, त्यानुसार, निश्चित केल्या गेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये एका विशिष्ट उपगटातील रुग्णांसाठी तपासाच्या आधारावर उपचारपद्धती देखील सांगण्यात आली आहे. मात्र, त्याआधी, कोणत्याही उपचारपद्धतीची सुरुवात करण्यापूर्वी त्याविषयीची सर्व माहिती संबंधितांना देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

इतर अपडेट्स:

  • पंतप्रधान नरेन्‍द्र मोदी यांनी लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक या देशाचे पंतप्रधान डॉ. थोंगलोउन सिसोउलिथ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कोविड 19 जागतिक साथीमुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक आव्हानांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. लाओसमध्ये या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाओ पिडीआर सरकारने केलेल्या प्रभावी उपाययोजनांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
  • पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी टांझानियाचे अध्यक्ष महामहीम डॉ जॉन पॉमबे जोसेफ मगुफुली यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. कोविड -19  च्या पार्श्वभूमीवर टांझानियामधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी टांझानियाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्रपती डॉ. मगुफुली यांचे आभार मानले. उभय नेत्यांनी एकूण द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या माय लाईफ, माय योगव्हिडीओ ब्लॉगिंग स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 21 जून 2020 पर्यंत वाढविली आहे. 6व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, आयुष मंत्रालय आणि भारतीय संस्कृती संबध परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल व्यासपीठावर या जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या एनएचएआय,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, क्लाऊड वर आधारित आणि कृत्रिम बुद्धिमत्ता बळावरच्या बिग डाटा एनेलेटीक्स मंच- डाटा लेक आणि प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर सुरु करून मोठी सुधारणा आणली आहे. एनएचएआयचे संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापन कार्याचे मानवी कार्यातून ऑनलाईन पोर्टल आधारित कार्यात परिवर्तन झाले आहे. वर्क फ्लो विथ टाईम लाईनआणि सतर्क यंत्रणा यासह प्रकल्प अंमलबजावणीचे संपूर्ण कार्य कॉन्फीगर करण्यात आले आहे. सर्व प्रकल्प दस्तावेजीकरण, कंत्राटविषयक निर्णय, मान्यता आता केवळ पोर्टल मार्फतच होतील.
  • जागतिक बाल मजुरी विरोधी दिनी 12 जून 2020 रोजी कामगार आणि रोजगार मंत्रालय (एमओएलई) आणि व्ही.व्ही. गिरी राष्ट्रीय कामगार संस्थेने (व्हीव्हीजीएनएलआय ), नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कामगार संघटनेच्या सहकार्याने  "कोविड -19: बाल मजुरीपासून मुलांचे रक्षण करा, आता सर्वात जास्त "या विषयावर राष्ट्रीय हितधारक वेबिनार आयोजित केला. सन 2020 मधील जागतिक बाल मजुरी विरोधी दिनी  बाल कामगारांवर कोविड -19 च्या संकटाचे परिणाम यावर भर देण्यात आला आहे.या वेबिनारचे उद्घाटन कामगार आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) संतोष कुमार गंगवार यांच्या हस्ते झाले. त्यांनी नमूद केले की मुले ही कोणत्याही देशाचा अविभाज्य भाग असतात आणि त्यांना त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासह सक्षम बनविणे आवश्यक आहे.
  • केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास आणि पंचायती राजमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रात क्रांतिकारक सुधारणा केल्या असून 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्याच्या घोषणेचा यात समावेश आहे. हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी छोट्या शेतकरी कृषिव्यवसाय कन्सोर्टियम (एसएफएसी) वर आहे, जी सध्याच्या परिस्थितीत ई-एनएएम मंचाला बळकट करण्यासाठी देखील जबाबदार आहे. एसएफएसीच्या स्थापनेनंतर संस्थात्मक आणि खासगी गुंतवणूकीत बरीच प्रगती झाली आहे. एसएफएसीच्या 24 व्या व्यवस्थापन मंडळाच्या आणि 19 व्या वार्षिक सर्वसाधारण मंडळाच्या सभांना संबोधित करताना तोमर यांनी एसएफएसी टीमचे दोन टप्प्यांत 1000 बाजारपेठा ई-एनएएमशी जोडल्याबद्दल अभिनंदन केले.

 

महाराष्ट्र अपडेट्स

शुक्रवारी 3,493 नवीन  कोविड-19  केसेस नोंद झाल्या त्यामुळे आजवर नोंद झालेल्या केसेसने एक लाखांचा टप्पा ओलांडला आणि एकूण रुग्ण संख्या 1,01,141 झाली. यापैकी 49,616 सक्रिय केसेस आहेत. एकूण मृत्यू 3,717 आहेत. केवळ मुंबई शहराने 55,451 कोरोना केसेस तर 2,044 मृत्यू नोंदवले आहेत. यादरम्यान महाराष्ट्र सरकारने covid-19 चाचणीचा खाजगी प्रयोगशाळेमधील दर 2,200 रुपये ठरवला आहे हा दर अगोदर 4,400 रुपये होता.

FACT CHECK

Image

*****

RT/MC/SP/PK

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1631421) Visitor Counter : 37