आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 विषयक ताजी स्थिती


रुग्ण बरे होण्याच्या दरात 49.95 टक्क्यांपर्यंत सुधारणा

Posted On: 13 JUN 2020 6:55PM by PIB Mumbai

 

गेल्या 24 तासात देशभरात कोविडचे 7,135 रुग्ण उपचारानंतर बरे झाले. यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,54,329 इतकी झाली आहे. कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 49.95% इतका आहे. सध्या देशभरात 1,45,779 सक्रीय रुग्ण असून त्या सर्वांवर उपचार सुरु आहेत.

आयसीएमआर ने कोविड रुग्ण चाचणी क्षमता सातत्याने वाढवत नेली आहे. सध्या देशभरात 642 सरकारी आणि 243 खाजगी (एकूण 885) प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 च्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. गेल्या 24 तासात देशात, 1,43,737 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत, देशात कोविडच्या एकूण 55,07,182 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

कोविड-19 च्या रुग्णांच्या वैद्यकीय व्यवस्थापनाबाबत आरोग्य मंत्रालयाने नवे प्रोटोकॉल जारी केले असून ते पुढील लिंकवर बघता येतील-- https://www.mohfw.gov.in/pdf/ClinicalManagementProtocolforCOVID19.pdf

नव्या प्रोटोकॉलनुसार, कोविड-19 च्या रूग्णांची स्थिती, त्यांना जाणवणारी लक्षणे, सौम्य, मध्यम अथवा गंभीर स्वरूपाची आहेत, का हे तपासून, त्यानुसार, वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापन केले जात आहे. संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणाच्या पद्धती देखील रुग्ण या तीनपैकी कोणत्या पातळीवर आहे, हे तपासून, त्यानुसार, निश्चित केल्या गेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये एका विशिष्ट उपगटातील रुग्णांसाठी तपासाच्या आधारावर उपचारपद्धती देखील सांगण्यात आली आहे. मात्र, त्याआधी, कोणत्याही उपचारपद्धतीची सुरुवात करण्यापूर्वी त्याविषयीची सर्व माहिती संबंधितांना देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

****

M.Chopade/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631398) Visitor Counter : 265