पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान  नरेन्‍द्र मोदी आणि  लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिकचे पंतप्रधान डॉ. थोंगलोउन सिसोउलिथ यांच्यात  दूरध्वनीवरून चर्चा

Posted On: 12 JUN 2020 10:44PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेन्‍द्र मोदी यांनी  आज लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक या देशाचे पंतप्रधान डॉ. थोंगलोउन सिसोउलिथ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

कोविड 19 जागतिक साथीमुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक आव्हानांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.  लाओसमध्ये या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाओ पिडीआर सरकारने केलेल्या प्रभावी उपाययोजनांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

 कोविडनंतर नव्या जगानुरूप तयार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची   आवश्यकता आणि  सर्वोत्तम पद्धती  तसेच अनुभवांचे आदानप्रदान याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

पंतप्रधान  नरेन्‍द्र मोदी यांनी  लाओससोबत असलेल्या   भारताच्या   ऐतिहासिक आणि  सांस्कृतिक संबंधांना उजाळा दिला आणि  लाओसमधल्या  वात फो इथे जागतिक वारसास्थळाच्या पुनर्निर्माणातील सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. लाओसच्या विकासकामांमध्ये, क्षमता बांधणी आणि शिष्यवृत्तीसाठी भारत करत असलेल्या सहकार्याबद्दल लाओसच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान  मोदी यांचे आभार मानले. 

भारताचा महत्त्वपूर्ण  भागीदार असलेल्या लाओ पीडीआरसोबत आपली विकास भागीदारी सुरूच ठेवण्याबाबतच्या भारताच्या प्रतिबद्धतेचा पुनरूच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला. 

*****

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1631331) Visitor Counter : 264