आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयक ताजी स्थिती
आयसीएमआरच्या सीरो-सर्वेक्षण अध्ययनानुसार, चाचणी केलेल्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 0.73 टक्के लोकांना कोविड-19 चा संसर्ग
Posted On:
11 JUN 2020 7:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2020
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-आयसीएमआर ने केलेल्या सीरो सर्वेक्षण म्हणजेच रक्तचाचणी अध्ययनात असे आढळले आहे की एकूण तपासलेल्या नमुन्यांमधील 0.73 टक्के लोकांना याआधी सार्स-कोविड-2 चा संसर्ग झाल्याचे पुरावे आढळले आहेत. आयसीएमआर चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आयसीएमआर ने मे 2020 मध्ये, राज्य आरोग्य विभाग, एनसीडीसी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने, कोविड-19 साठीचे पहिले सेरो सर्वेक्षण घेतले होते. या अंतर्गत, 83 जिल्ह्यातील 28,595 कुटुंबे आणि 26,400 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. या अध्ययनाचे दोन भाग असून प्राथमिक पातळीवर, एकूण सर्वसामान्य लोकसंख्येपैकी, लोकसंख्येचा असा भाग अंदाजे वेगळा काढला गेला, ज्यांना सार्स-कोविड-2 ची बाधा झाली होती, हे काम पूर्ण झाले आहे आणि अध्ययनाच्या दुसऱ्या भागात, प्रतिबंधित क्षेत्र किंवा हॉट स्पॉट मधील लोकसंख्येचा असा भाग वेगळा काढण्यात आला ज्यांना सार्स-कोविड-2ची बाधा झाली, हे काम प्रगतीपथावर आहे.
या अध्ययनात, लॉकडाऊनच्या काळात, केलेल्या उपाययोजनांमुळे संक्रमण कमी करण्यात आणि कोविड नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आयसीएमआरच्या निष्कर्षानुसार, ग्रामीण भागाच्या तुलनेत,शहरी भागात हे संक्रमण पसरण्याची शक्यता, 1.09 पट अधिक आहे, तर शहरी भागातील झोपडपट्यामध्ये हा धोका 1.89 पट अधिक आहे. संसर्गित रुग्णांचा मृत्यूदर 0.08% आहे. याचा एक अर्थ असाही आहे की लोकसंख्येच्या मोठ्या भागाने अद्याप कोविड बाबतीतली सर्व काळजी घेणे आणि नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
गेल्या 24 तासांत, देशभरात कोविडचे 5,823 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,41,028 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता 49.21% इतका झाला आहे. सध्या देशात, 1,37,448 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या, सक्रीय रूग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1630950)
Visitor Counter : 312
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam