आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची सद्यस्थिती


सामाजिक आणि आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करताना सार्वजनिक आणि निम-सार्वजनिक वातावरणात काम करण्यासाठी मानक कार्यप्रणाली जारी

Posted On: 05 JUN 2020 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2020

वर्गीकृत, प्रतिबंधात्मक आणि सक्रिय दृष्टिकोनातून भारत आपली टाळेबंदी उठवण्याची प्रक्रिया सुलभ करीत असल्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविडचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असलेल्या सार्वजनिक आणि निम-सार्वजनिक वातावरणात काम करण्यासाठी एसओपी अर्थात प्रमाणित कार्यप्रणाली अपलोड केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सामाजिक आणि आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्याची परवानगी देताना कोविडला सुसंगत आचरण बिंबविण्याबरोबरच या रोगाच्या प्रसाराची साखळी तोडण्याचा उद्देश आहे.

कार्यालयांमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांविषयी एसओपी https://www.mohfw.gov.in/pdf/1SoPstobefollowedinOffices.pdf  वर मिळू शकेल.

उपासना स्थळांमध्ये कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर एसओपी https://www.mohfw.gov.in/pdf/2SoPstobefollowedinReligiousPlaces.pdf वर मिळवता येईल.

रेस्टॉरंट्समध्ये कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर एसओपी https://www.mohfw.gov.in/pdf/3SoPstobefollowedinRestorses.pdf  वर मिळवता येऊ शकेल.

शॉपिंग मॉल्समध्ये कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर एसओपी https://www.mohfw.gov.in/pdf/4SoPstobefollowedinShoppingMalls.pdf  वर मिळवता येईल

हॉटेल आणि आदरातिथ्य करणाऱ्या विभागात कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर एसओपी https://www.mohfw.gov.in/pdf/5SoPstobefollowedinHotelsandotherunits.pdf वर मिळवता येईल.

कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सीएस (एमए) अर्थात केंद्रीय सेवा (वैद्यकीय उपस्थिती) लाभार्थ्यांना बाह्य रुग्ण विभागातून मिळणाऱ्या औषधांच्या भरपाई संदर्भात मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/OPDmedicinesspecialsanctionCOVID.pdf  यावर ती बघू शकता.

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 5,355 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत कोविड-19 चे एकूण 1,09,462 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोविड -19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 48.27% वर पोहोचले आहे. आजमितीस कोरोना बाधित 1,10,960 रुग्ण असून ते सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली आहेत.

सरकारी प्रयोशाळांची संख्या 507 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 217 पर्यंत वाढविण्यात आली आहे (एकूण 727 प्रयोगशाळा). गेल्या 24 तासांत 1,43,661 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या  43,86,379 आहे.

5 जून 2020 पर्यंत, 1,66,460 अलगीकरण खाटा, 21,473 अतिदक्षता खाटा आणि 72,497 ऑक्सिजन समर्थित खाटा असलेल्या 957 कोविड समर्पित रुग्णालये उपलब्ध झाल्यामुळे कोविडशी संबंधित आरोग्य सुविधा मजबूत झाली आहे. 1,32,593 अलगीकरण खाटा, 10,903 अतिदक्षता खाटा आणि 45,562 ऑक्सिजन समर्थित खाटा असलेली कोविड समर्पित 2,362 आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. देशात कोविड चा प्रसार रोखण्यासाठी 11,210 विलगीकरण केंद्रे आणि 7,529 कोविड सेवा केंद्रे असून तिथे 7,03,786 खाटा उपलब्ध आहेत. आतापर्यंत केंद्राने राज्ये / केंद्रशासित प्रदेश / केंद्रीय संस्थांना 128.48 लाख एन 95 मास्क आणि 104.74 लाख वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) उपलब्ध करुन दिली आहेत.

कोविड -19 शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी    अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/  आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in  यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in  and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  यावर उपलब्ध आहे.

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1629621) Visitor Counter : 273