आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 विषयक ताजी स्थिती


आतापर्यंत कोविड19 चे एकूण 95,526 रुग्ण उपचारानंतर बरे

Posted On: 02 JUN 2020 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2020

सध्या देशभरात कोविड-19 चे 97,581 सक्रिय रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासांत कोविडचे 3,708 रुग्ण  बरे झाले आहेत. आतापर्यंत देशभरात कोविडचे 95,526 रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 48.07% इतका आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून जगातल्या सर्वात कमी मृत्यूदरांइतका मृत्यूदर भारतात आहे. आज देशात मृत्यूदर 2.82%इतका आहे.

भारताची लोकसंख्या आणि कोविडचा सर्वाधिक फटका बसलेल्या 14 देशांची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. मात्र एकसारखीच लोकसंख्या असूनही 1 जून 2020 ला या 14 देशांमधील एकत्रित लोकसंख्येपैकी कोविडचा संसर्ग झालेल्यांची संख्या भारताच्या 22.5 पट अधिक आहे. या 14 देशांमध्ये कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत 55.2 पट इतकी आहे.

अशा परिस्थितीत, आपला संपूर्ण भर मृत्यूदर कमी करण्यावर आहे. त्यासाठी वेळेत रुग्ण ओळखून त्या रुग्णांवर उपचार करण्याकडे लक्ष आहे. देशात मृत्यूदर तुलनेने कमी असण्याचे श्रेय दोन प्रमुख उद्दिष्ट ठेवून आखलेल्या धोरणाला जाते. वेळेवर रुग्ण शोधणे आणि त्यावर व्यवस्थात्मक उपचारपद्धती.

जर कोविड-19 मुळे आजवर झालेल्या मृत्यूंची आकडेवारी तपासली, तर असे लक्षात येते की देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 10 टक्के लोकसंख्या असलेल्या (म्हणजेच,60 वर्षेपेक्षा अधिक वयाचे) ज्येष्ठ नागरिकांचे एकूण मृत्यूपैकी 50 टक्के मृत्यू आहेत. एकूण मृत्युंपैकी 73 टक्के मृत्यू अशा रुग्णांचे आहेत, ज्यांना कोरोनासोबत इतरही काही आजार आहेत.(यात मधुमेह,उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि श्वसनाचे विकार इत्यादी) त्यामुळेच, या अधिक धोका असलेल्या गटाची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

अति धोका असलेल्या रूग्णांना कोविडचा संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी, काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यात- इतर आजारांवरची डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित सुरु ठेवावी, आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या उपाययोजना-जसे की हर्बल चहा, काढा पिणे सुरु ठेवावे. जर वैद्यकीय सल्ला हवा असल्यास, टेली-मेडिसिनचा वापर करावा, (उदाहरणार्थ-संजीवनी) आरोग्य सेतूचा वापर करुन, आपण कोविड संसर्गित रुग्णांच्या संपर्कात आलो नाही ना, याची खातरजमा करत रहा, आरोग्य सेतूच्या मदतीने स्वयंपरीक्षण करुन कोविडची लक्षणे नाहीत ना, हे तपासात रहा.नियमितपणे आपले आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे मूल्यमापन करत रहा. जर अति धोका असलेल्या व्यक्तींना कोविडची लक्षणे आढळली, तर त्यांनी लगेच रुग्णालयात जाऊन अथवा टेली मेडिसिनच्या माध्यमातून वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे. किंवा प्रत्यक्ष डॉक्टरांना दाखवावे. 

उच्च धोका असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य-स्वच्छतेच्या चांगल्या सवयी कायम ठेवाव्यात. हात धुणे, मास्कचा वापर, जवळचे संपर्क टाळणे इत्यादी काळजी घ्यावी. जर एखाद्याला काही लक्षणे आढळली, तर त्यांच्यापासून उच्च धोका असलेल्या लोकांना दूर ठेवा. गर्दी किंवा धर्मिक संमेलनाच्या ठिकाणी जाणे टाळा.

जर अत्यावश्यक नसेल, तर बाहेर पडू नका, घरातच रहा, अशी आग्रही सूचना आहे.

आपला कोविड-19 विरुध्दचा लढा यशस्वी करायचा असले, तर ही एक जनचळवळ व्हायला हवी. जनतेला विनंती आहे की त्यांनी #IndiaWillWin चा वापर करुन, कोविड-19 च्या लढ्यात एकमेकांना पुढील तीन कामात सहकार्य करण्याची प्रतिज्ञा करावी:-जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेत उपचार.

कोविड-19संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in  आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in

कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1628809) Visitor Counter : 387