पंतप्रधान कार्यालय
तेलंगण राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा, आंध्र प्रदेशच्या जनतेलाही शुभेच्छा
Posted On:
02 JUN 2020 12:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगण राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या जनतेलाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
तेलंगण दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा. या राज्यातली जनता अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. भारताच्या विकासगाथेमध्ये या राज्याचे मोलाचे योगदान आहे. तेलंगणच्या प्रगती आणि समृद्धीची सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
आंध्र प्रदेशच्या जनतेलाही शुभेच्छा. मेहनत आणि धैर्य ही या भूमीची संस्कृती आहे. भारताच्या विकासात या राज्याची भूमिका मोलाची राहिली आहे. उज्वल भविष्यासाठी,पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1628574)
Visitor Counter : 175
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam