रसायन आणि खते मंत्रालय

कोविड-19 लढ्यासाठी, WHO/ISO च्या दिशानिर्देशानुसार PPE उत्पादन आणि प्रमाणीकरणाद्वारे CIPET आरोग्यसेवा क्षेत्रात संशोधन आणि विकास कामी पुढाकार घेणार


मुरूथल, जयपूर, मदुराई आणि लखनौ येथील CIEPT केंद्रांनी कोरोनाविषाणूशी लढ्यात संरक्षक साधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या फेसशिल्ड विकसित केल्या

Posted On: 27 MAY 2020 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मे 2020

 

कोविड-19 महामारीशी दोन हात करण्यासाठी केंद्रीय प्लॅस्टीक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (CIPET) ही भारत सरकारच्या रसायने आणि खत मंत्रालयाच्या अधिपत्याखालील नामवंत संस्था, WHO/ISO च्या दिशानिर्देशानुसार PPE उत्पादने आणि त्याचे प्रमाणीकरण आणि तत्सम इतर उत्पादनांच्या निर्मितीद्वारे  आरोग्यसेवाक्षेत्रात पाउल टाकत आहे. 

CIPET ने दिलेल्या निवेदनाप्रमाणे कॅबिनेट सचिवांच्या निर्देश आणि सुचनेनुसार CIPET आरोग्यसेवाक्षेत्रात संशोधन आणि विकासकामी पुढाकार घेत आहे. त्यानुसार WHO/ISO तसेच राष्ट्रीय परिक्षण आणि सुसुत्रीकरण प्रमाणन संस्था (NABL) च्या दिशानिर्देशांनुसार PPE आणि तत्सम उत्पादनाच्या परिक्षणाचे काम  पुढील तीन CIPET केंद्रात लवकरच सुरू होत आहे. ती केंद्रे म्हणजे भुवनेश्वर, चेन्नई आणि लखनौ येथील  प्लॅस्टीक तंत्रज्ञान संस्था (IPTs).

CIPET: कौशल्य आणि तंत्रज्ञान सपोर्ट केंद्र (CSTS), मुर्थल इथे आरोग्यसेवक, शेतकरी, मजूर, पोलिस कर्मचारी यांना कोरोनाविषाणूपासून संरक्षक साधन म्हणून वापरता येणारे ‘फेस शिल्ड’ विकसित केले आहे.

CIPET: CSTS, जयपूर, CIPET: IPT लखनौ, आणि CIPET: CSTS मदुराई इथे फेसशिल्ड आणि फ्रेम्सचे उत्पादन सुरू आहे.

CIPETने मंत्रालय व्यवस्थापनाच्या आदेशानुसार अत्याआवश्यक सेवा म्हणून धान्य पॅकेजिंगच्या तपासणीच्या कामाची व्याप्ती वाढवली आहे.

या कामी येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी नऊजणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक प्रशिक्षण सपोर्ट आणि इतर सेवांच्या देवाणघेवाणीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे CIPETने कमीतकमी मनुष्यबळ वापरत आणि सुरक्षित अंतराचे नियमपालन करत  तीन पाळ्यांमध्ये काम सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

कोविड-19मुळे उ कठीण परिस्थितीला सामोरे जाताना CIPETने समाजसेवेच्या उद्देशाने पीएम केअर्स निधीत योगदान दिले आहे. तसेच योगदान स्थानिक संस्था/नागरी संस्था/ राज्य सरकारी उपक्रमांमध्येही दिले आहे. CIPET च्या कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन देत, एकूण 18.25 लाख रुपयांची रक्कम पीएम केअर्स निधीत दिली आहे.

CIPETने आतापर्यंत विविध स्थानिक उपक्रम/ स्थानिक स्वराज्य संस्था/ राज्य सरकारी उपक्रम यांना CIPET च्या योग्य आधिकारीक मंजूरीने  85.50 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. याचा उपयोग कोरोना विषाणू प्रकोपामुळे (कोविड-19) भारत सरकारद्वारे करण्यात आलेल्या लॉकडाउनचे परिणाम होत असलेल्या स्थलांतरीत मजूर तसेच इतर प्रभावित व्यक्तींना अन्न आणि निवारा पुरवण्यासाठी करण्यात आला.

 

M.Jaitly/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1627181) Visitor Counter : 280