PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 24 MAY 2020 8:50PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, May 24, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने श्रेणीबद्ध, तसेच, पूर्वदक्षता घेऊन सक्रीय उपाययोजना सुरु आहेत. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवरुन नियमित देखरेख ठेवली जात आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज दिल्लीतील चौधरी ब्रह्मप्रकाश आयुर्वेद चरक संस्थान ला भेट दिली. हे संस्थान सध्या कोविड-19 च्या रुग्णांच्या व्यवस्थापनावर देखदेख ठेवण्यासाठी, कोविडचे समर्पित आरोग्य केंद्र म्हणून कार्यरत आहे. डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी रूग्णालयातील विविध सुविधा आणि वार्ड ची पाहणी केली. तसेच कोविड 19 च्या रुग्णांवर आयुष मंत्रालयाच्या निर्देशांनुसार सुरु असलेल्या सर्वोपचारांचीही माहिती घेतली.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार,समर्पित कोविड हेल्थ सेंटर्समध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या सर्व कोविड  रुग्णांवर उपचार केले जातात आणि त्यांची काळजी घेतली जाते. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार हे संपूर्ण स्वतंत्र रुग्णालय असावे किंवा रुग्णालायातील एखादा विभाग/वार्ड ज्याला वेगळे प्रवेशद्वार असेल.

परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना आपण पुढील लिंकवर बघू शकता:

https://www.mohfw.gov.in/pdf/Guidelinesforinternationalarrivals.pdf

देशांतर्गत प्रवासासाठी देखील आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत (हवाई/ट्रेन/आंतर-राज्य बस सेवा ई). या सूचना पुढील लिंकवर बघता येतील.

 https://www.mohfw.gov.in/pdf/Guidelinesfordomestictravel(airortrainorinter-statebustravel).pdf

आतपर्यंत देशातील एकूण 54,440 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 2,657 रुग्ण उपचारानंतर बरे झाले.  रुग्ण बरे होण्याचा दर 41.28% इतका आहे.

कालपासून देशात, 6,767 नव्या रुग्णांची भर पडली आहे. देशातील एकून कोविड रुग्णांची संख्या  1,31,868 असून  त्यापैकी वैद्यकीय उपचारांखाली असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 73,560 इतकी आहे.

 

इतर अपडेट्स:

  • मिशन सागरचा एक भाग म्हणून, भारतीय नौदल जहाज केसरीने 23 मे 2020 रोजी पोर्ट लुईस मॉरिशसमध्ये प्रवेश केला. केंद्र सरकार कोविड -19  महामारीचा सामना करण्यासाठी शेजारी मित्र देशांना मदत पुरवत आहे, आणि या भारतीय नौदल जहाज केसरीने कोविड संबंधित आवश्यक औषधे आणि आयुर्वेदिक औषधांची एक खास खेप मॉरीशसच्या लोकांसाठी नेली आहे
  • केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान आणि आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी, राजेश भूषण यांच्यासह,आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत, देशातील, सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या 11 महानगरपालिका क्षेत्रातील प्रधान आरोग्य सचिव, नागरी विकास सचिव, महापालिका आयुक्त, आणि अभियान संचालकांसह त्या भागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव, कामरान रिझवी देखील व्हिडीओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.

महाराष्ट्र अपडेट्स

  • महाराष्ट्रात 2,608 नवीन रुग्ण नोंद झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या 47,190 झाली आहे त्यापैकी 32,201 सक्रिय रुग्ण आहेत मुंबई या हॉटस्पॉट मध्ये 1,566 नवीन केसेस नोंद झाल्या. शहरातील एकूण संख्या 28 634 झाली आहे.

 

***

 

RT/MC/SP/PM

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626644) Visitor Counter : 272