शिक्षण मंत्रालय
दहावी-बारावी सीबीएसई परीक्षांच्या उर्वरित पेपर्सच्या तारखा मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून घोषित
प्रविष्टि तिथि:
18 MAY 2020 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2020
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज नवी दिल्लीत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उर्वरित पेपर्सच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार, दिल्लीतील केवळ ईशान्य दिल्ली भागातील दहावीच्या मुलांच्या परीक्षा घेतल्या जातील. तर बारावीच्या मात्र, संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. 5 जुलै पासून सुरू होणाऱ्या या सर्व परीक्षा सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत घेतल्या जातील.
याआधी, 5 मे रोजी एका वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा करतांना पोखरीयाल यांनी सांगितले होते की सीबीएसई दहावी आणि बारावीचे उर्वरित पेपर्स, 1 ते 15 जुलै दरम्यान घेतले जातील.
परीक्षांच्या तारखा जाहीर करतांना विद्यार्थ्याना तयारी करायला पुरेसा वेळ मिळेल, याची पूर्ण काळजी घेण्यास मनुष्यबळ विकास मंत्रालय कटिबद्ध आहे, आता विद्यार्थी आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करु शकतील, असेही पोखरीयाल यांनी या वेबिनारच्यावेळी स्पष्ट केले होते. याशिवाय, ह्या परीक्षा घेतांना शारीरिक अंतराच्या नियमांचे पूर्ण पालन केले जावे, अशा सूचना सीबीएसई ला दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
इयत्ता दहावीच्या परीक्षांच्या तारखा बघण्यासाठी इथे क्लिक करा.
इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या तारखा बघण्यासाठी इथे क्लिक करा.
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1624895)
आगंतुक पटल : 270
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam