संरक्षण मंत्रालय

समुद्र सेतू अभियान – आयएनएस जलाश्व दुसऱ्या टप्प्यासाठी मालदीवला परतली

प्रविष्टि तिथि: 14 MAY 2020 9:06PM by PIB Mumbai

 

परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे मायदेशी परत आणण्यासाठी सुरु केलेल्या समुद्र सेतू अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस जलाश्व माले, मालदीव येथे परत गेली आहे. हे जहाज 15 मे 2020 रोजी पहाटे माले येथे दाखल होईल आणि मालदीव मधील भारतीय दुतावासात नोंदणी केलेल्या भारतीय नागरिकांना जहाजावर प्रवेश देईल. आपल्या दुसऱ्या प्रवासात, आयएनएस जलाश्व 700 भारतीय नागरिकांना मायदेशी घेऊन येईल अशी योजना असून हे जहाज 15 मे च्या रात्री कोचीसाठी रवाना होईल.  

याआधी, 12 मे 2020 रोजी 698 भारतीय नागरिकांना यशस्वीरीत्या कोची येथे आणल्यानंतर आयएनएस जलाश्वने निर्वासन अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वतयारीला सुरुवात केली ज्यामध्ये संपूर्ण जहाजाचे निर्जंतुकीकरण आणि सॅनिटायझेशन समाविष्ट होते यात परत आलेल्या नागरिकांच्या मागील गटाने वापरलेल्या जहाजाच्या भागाकडे विशेष लक्ष देण्यात आले होते.

जहाजाने माले बाहेर नांगर टाकला असून 15 मे 2020 रोजी भारतीय नागरिकांच्या दुसऱ्या गटाला जहाजामध्ये प्रवेश द्यायला सुरुवात करेल, ज्यामध्ये 100 महिला आणि बालकांसह अंदाजे 700 भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले जाईल.

***

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1623908) आगंतुक पटल : 324
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Assamese , Manipuri , Punjabi , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam