आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ हर्ष वर्धन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 32 व्या राष्ट्रकुल आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी


कोविड 19  व्यवस्थापनाच्या दिशेने भारताने वेळेवर केलेले टप्प्याटप्प्याचे आणि सक्रिय उपाय अधोरेखित केले

Posted On: 14 MAY 2020 9:01PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन आज नवी दिल्लीत  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 32 व्या राष्ट्रकुल आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले. समन्वयित राष्ट्रकुल कोविड -19 प्रतिसाद प्रदान करणे अशी या बैठकीची संकल्पना होती.

जागतिक बैठकीत हस्तक्षेपाचा एक भाग म्हणून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलेले निवेदन पुढीलप्रमाणे –

"सर्वप्रथम राष्ट्रकुल कोविड -१९ प्रतिसाद देताना' कोविड -१९ मुळे झालेल्या जीवितहानीबद्दल मी मनापासून शोक आणि चिंता व्यक्त करू इच्छितो. अनेकांचे मौल्यवान जीव वाचवण्यात आरोग्य सेवेतील  आघाडीवरच्या असंख्य योध्यांच्या तसेच  इतर नागरी संस्थांच्या प्रचंड योगदानाची आणि समर्पणाची आपण दखल घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पराकोटीच्या राजकीय वचनबद्धतेसह भारताने कोविड -१९  व्यवस्थापन हाती घेतले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड -१ ९ ला आमचा सक्रिय आणि श्रेणीबद्ध प्रतिसाद आहे.

भारताने व्यवस्थापनाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून देशात प्रवेशांच्या ठिकाणी देखरेख ठेवणे, परदेशी नागरिकांची सुटका करणे , रोगावरील देखरेखनेटवर्कच्या माध्यमातून  समुदायावर देखरेख , आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे, आरोग्य कर्मचार्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढवणे, जोखीम दळणवळण आणि समुदायाच्या सहभागासह सर्व आवश्यक पावले वेळेवर उचलली.

या साथीच्या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठे लॉकडाउन राबविताना, आम्ही या रोगाची स्फोटक वाढ रोखण्यासाठी आणि रोगाच्या वाढीला सक्षमपणे सामोरी जाणारी आरोग्य यंत्रणा सुनिश्चित करून जीवितहानी रोखण्याकडे लक्ष देत आहोत. त्याचवेळी आम्ही जीव वाचवण्याबाबत देखील जागरूक आहोत आणि म्हणूनच सर्व आवश्यक सेवा लॉकडाऊनच्या कक्षेतून दूर ठेवत आहोत.

आमच्या पंतप्रधानांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तसेच आमच्या लोकसंख्येच्या असुरक्षित घटकांना मदत करण्यासाठी 265 अब्ज अमेरिकी डॉलर्स पेक्षा अधिक आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.  ज्या भागात हा आजार नियंत्रणात ठेवण्यात आला आहे अशा ठिकाणी आम्ही हळूहळू निर्बंध शिथिल करत आहोत.

भविष्यातील सज्जताप्रतिसाद आणि लवचिकतेसाठी विकसनशील देशांची क्षमता विकसित करणे आणि विशेषत: कमी विकसित देशांची क्षमता मजबूत करणे महत्वाचे आहे.

कोविड -१९ च्या आव्हानाचा सामना करण्यासाठी एकत्रित जागतिक कृती करण्याचा आग्रह धरणारा भारत हा पहिला देश होता.  मार्चच्या मध्यात आम्ही आमच्या प्रदेशातील सार्क नेत्यांची बैठक आयोजित केली होती ज्यात “एकत्र येणे, वेगळे न होणे गोंधळ नव्हे तर सहकार्य; आणि न घाबरता सज्ज राहण्याची गरज अधोरेखित केली होती. हे घटक या संकटाला भारताच्या प्रतिसादाचे प्रतीक  ठरले आहेत.

भारताने जवळपास 100 गरजू देशांना हायड्रोक्सी क्लोरोक्विन सारखी आवश्यक औषधे दिली आहेत आणि या संकटाच्या वेळी एकता आणि मदत देऊ केली आहे.

साथीच्या आजाराच्या कारणावर काम करणे आणि प्रसार नियंत्रित करण्यासाठी आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी औषधे आणि लसींचा शोध घेणे आवश्यक आहे.

सर्व  संबंधित वैद्यकीय उत्पादने आणि विद्यमान आणि नवीन दोन्ही प्रकारचे तंत्रज्ञान सर्वांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे  महत्वाचे आहे. कोविड -१९  चा सामना करण्यासाठी योग्य आणि न्याय्य पद्धतीने हे उपलब्ध करुन दिले पाहिजे.

भारतीय शास्त्रज्ञ केंद्र सरकारच्या सक्रिय पाठिंब्यासह लस, औषधे तसेच किफायतशीर प्रभावी निदान करणारी किट्स आणि विविध जीवनदायी उपकरणांच्या शोधावर काम करत आहेत.

आपण कोविड नंतरच्या युगातील नवीन धोके आणि आव्हाने यावर मात करण्यासाठी आपल्या सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान आणि अभिनव  मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे.“

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623906) Visitor Counter : 223