गृह मंत्रालय
रेल्वेगाडीने प्रवासी वाहतूक करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रमाणित कार्यवाही प्रोटोकॉल (SOP) जारी
Posted On:
11 MAY 2020 4:46PM by PIB Mumbai
रेल्वेगाडीने प्रवाशांची वाहतूक करण्याबाबत ची नियमावली म्हणजेच प्रमाणित कार्यवाही प्रोटोकॉल (SOP) केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले आहेत.
प्रवाशांची जाण्यायेण्याची वाहतूक आणि रेल्वे स्थानकावर प्रवेश केवळ कन्फर्म ई-तिकीट असलेल्यांनाच मिळणार आहे. सर्व प्रवाशांचे वैद्यकीय स्क्रीनिंग करणे अनिवार्य असेल. केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच रेल्वेत चढण्याची परवानगी मिळेल स्थानकांवर तसेच रेल्वेगाडीत स्वच्छता आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य ठरेल.
सर्व प्रवाशांना पहिल्या आणि शेवटच्या इच्छित स्थानकांवर तसेच डब्यातही हॅन्ड सॅनिटायझर दिले जाईल. तसेच सर्व प्रवाशांनी मास्क घातले आहेत किंवा चेहरा झाकला आहे हे तपासले जाईल. सर्व प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचल्यानंतर त्या संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य असेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी वेळोवेळी सल्लामसलत करुन, रेल्वे मंत्रालय टप्प्याटप्याने रेल्वे वाहतूक सुरु करणार आहे.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी केलेला अधिकृत पत्रव्यवहार बघण्यासाठी येथे क्लिक करावे.
*****
B.Gokhale/ R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1622969)
Visitor Counter : 322
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam