रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वे द्वारा ठराविक प्रवासी सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार

Posted On: 10 MAY 2020 11:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 मे 2020

 

12 मे 2020 पासून भारतीय रेल्वे हळूहळू प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे.  सुरुवातीला 15 मार्गावरील सेवा सुरू होतील (30 रिटर्न फेऱ्या). या रेल्वे स्पेशल रेल्वे म्हणून नवी दिल्ली स्टेशन वरून दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पटना बिलासपुर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलोर, चेन्नई, तिरुवनन्तपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावी या ठिकाणी सुरू होतील. यानंतर भारतीय रेल्वे आणखी स्पेशल सेवा नवीन मार्गांवर सुरू करेल. परंतु कोविड-19 सेवा केंद्रे म्हणून राखीव ठेवलेले 20,000 कोचेस तसेच दर दिवशी 300 गाड्या श्रमिक स्पेशल म्हणून राखीव ठेवल्यानंतर उरलेल्या डब्यांवर आधारित नवीन मार्ग ठरवले जातील.

यासाठीचे आरक्षण 11 मे रोजी दुपारी 4 पासून सुरू होईल आणि ते IRCTC च्या वेबसाईटवर (https://www.irctc.co.in/) उपलब्ध असेल. रेल्वे स्टेशन वरील आरक्षण खिडक्या बंद राहतील आणि तेथून कुठलीही तिकिटे (प्लॅटफॉर्म तिकीटासहित) विकली जाणार नाहीत. केवळ असेच प्रवासी ज्यांच्याकडे वैध कन्फर्म तिकीट आहे त्यांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश दिला जाईल. प्रवाशांना फेस कवर वापरणे बंधनकारक असेल तसेच गाडी सुटते वेळी त्यांची तपासणी केली जाईल आणि लक्षणें नसलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल गाड्यांचे वेळापत्रक आणि इतर तपशील लवकरच जाहीर केला जाईल.


* * * 

R.Tidke/M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1622840) Visitor Counter : 327