संरक्षण मंत्रालय
कोविड-19 चा धोका कमी करण्याविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची जपानच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर दूरध्वनीवरून चर्चा
Posted On:
08 MAY 2020 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2020
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जपानचे संरक्षण मंत्री तारो कोनो यांच्याबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली.
कोविड-19 महामारीच्या विरोधामध्ये आपआपल्या देशात करण्यात आलेल्या उपाय योजनांविषयी उभय मंत्र्यांनी यावेळी बातचीत केली. राजनाथ सिंह यांनी यावेळी कोविड-19 च्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर जे प्रयत्न सुरू आहेत, त्यामध्ये भारताने दिलेल्या योगदानाची माहिती तारो कोनो यांना दिली. त्याचबरोबर या वैश्विक महामारीच्या विरोधामध्ये एकमेकांना कोणत्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करता येईल, याची चर्चा केली. भारत आणि जपान हे दोन्ही देश विशेष रणनीती आणि जागतिक भागिदारीचा विचार करून कोरोना महामारी संकटामुळे निर्माण झालेल्या आणि यापुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जातील, तसेच इतर देशांना बरोबर घेवून संयुक्तपणे कार्य करून सर्वांना एक मजबूत आधार देतील, यावर उभय संरक्षण मंत्र्यांचे एकमत झाले.
दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी भारत-जपान विशेष रणनीती आणि वैश्विक भागिदारीच्या चौकटीअंतर्गत व्दिपक्षीय सुरक्षा सहयोग करण्यासाठी पुढाकार घेण्याविषयीची कटिबद्धता व्यक्त केली.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1622460)
Visitor Counter : 201
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada