गृह मंत्रालय

भारतातून / भारताकडे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील बंदी उठवेपर्यंत, परदेशी व्यक्तींना सध्या मंजूर केलेले सर्व व्हिसा- काही ठराविक वर्गांचा अपवाद वगळून- स्थगितच राहणार

Posted On: 05 MAY 2020 8:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

देशात सुरू असलेल्या कोविड -19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने 17.04.2020 रोजी व्हिसांच्या स्थगितीबाबत निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार, सध्या परदेशी व्यक्तींना मंजूर केलेल्या सर्व व्हिसांची स्थगिती 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आली. याला उच्च अधिकारी, अधिकारी, संयुक्त राष्ट्र / आंतरराष्ट्रीय संघटना, रोजगार आणि प्रकल्प वर्ग, यांचा अपवाद करण्यात आला.

(https://pib.gov.in/PressReleseDetail.aspx?PRID=1615500)

 

मात्र, या प्रकरणी पुन्हा विचार केल्यानंतर, आता असा निर्णय घेण्यात आला आहे की- मुत्सद्दी, उच्च अधिकारी, संयुक्त राष्ट्र/ आंतरराष्ट्रीय संघटना, रोजगार आणि प्रकल्प वर्ग सोडून, अन्य सर्व परदेशी व्यक्तींना देण्यात आलेले सध्याचे सगळे व्हिसा, भारताकडून/ भारताकडे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी भारत सरकारने उठवेपर्यंत स्थगितच राहतील.

 

Click here to see Official Order

 

**

B.Gokhale/ J.Waishampayan/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622083) Visitor Counter : 156