पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान एच इ अंटॉनियो कोस्टा यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

Posted On: 05 MAY 2020 7:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान एच इ अंटॉनियो कोस्टा यांच्यात आज दूरध्वनीवरुन चर्चा झाली. पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूझा यांनी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या भारताच्या दौऱ्याचे पंतप्रधानांनी यावेळी स्मरण केले.

 दोन्ही नेत्यांमध्ये कोविड१९ची सद्यस्थिती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांवर चर्चा केली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान कोस्टा करत असलेल्या उपाययोजनांचे मोदींनी कौतुक केले.

राष्ट्रीय स्तरावर पूर्वदक्षता घेऊन करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यात मदत झाली, असे मत उभय नेत्यांनी व्यक्त केले. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एकमेकांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिले.

कोविड-19 च्या लढ्यात संशोधन आणि  परस्पर सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. लॉकडाऊनमुळे जे भारतीय नागरिक पोर्तुगालमधून मायदेशी परतू शकले नाहीत, त्यांच्या व्हिसाची मुदत वाढवून दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कोस्टा यांचे आभार मानले.भारतात अडकलेल्या पोर्तुगीज नागरिकांना दिलेल्या सुविधांबाबत कोस्टा यांनी भारतीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.

सध्याच्या कोविडच्या संकटात आणि त्यानंतरही परस्परांच्या संपर्कात राहून परिस्थतीवर मात करण्यासाठी सल्लामसलत करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

***

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622069) Visitor Counter : 177