आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 व्यवस्थापनासंबधीत उत्तर प्रदेश ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील तयारी आणि प्रतिबंधक उपायांचा केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा


सारी आणि ईली रोगांचे नमूने गोळा करणे आणि परीक्षण तसंच इतर राज्यातून येणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी योग्य अलगीकरण यांची आवश्यकता

Posted On: 07 MAY 2020 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2020

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंग, ओडिशाचे आरोग्य मंत्री नबकिशोर दास तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे आणि राज्य तसेच केंद्राचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत तीनही राज्यांमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. 

सुरूवातीला हर्षवर्धन यांनी देशात covid-19 महामारीशी  सर्वतोपरी लढत असणाऱ्या सर्व राज्यांचे कौतुक केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 मे 2020 ला  देशात 52,952 रुग्णसंख्या  नोंदवली गेली. त्यापैकी 15,266 रुग्ण बरे झाले तर 1,783 आजाराला बळी पडले. गेल्या चोवीस तासात 3,561 नवीन निदान झालेल्या रुग्णांची भर पडली तर 1,084 रुग्ण रोगमुक्त झाले.  इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली असून मृत्यूदर 3.3टक्के तर रोगमुक्तीचा दर 28.83टक्के आहे असे त्यांनी नमूद केले. देशातील एकूण रुग्णांपैकी 4.8टक्के. रुग्ण आयसीयूमध्ये,  1.1टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर  , तर 3.3टक्के रुग्ण ऑक्सिजन आधारावर आहेत असे त्यांनी सांगितले.  ते पुढे म्हणाले की देशात रोग परीक्षण क्षमता वाढवली असून 327 सरकारी परिक्षण केंद्रे आणि 118 खाजगी परिक्षण केंद्रांमध्ये दर दिवशी 95000 परीक्षणे होत आहेत. सर्व धरून आत्तापर्यंत covid-19 साठी 13,57,442 परीक्षणे करण्यात आलेली आहेत.

गेल्या सात दिवसात एकही नवीन रुग्ण नाहीत असे 180 जिल्हे आहेत तर 180 जिल्ह्यात गेल्या सात ते तेरा दिवसात एकही नवीन रुग्ण नाही. 164 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 ते 20 दिवसात नवीन केस नाही तर 21 ते 28 दिवसांमध्ये 136 जिल्ह्यांमध्ये एकही नवीन रुग्ण नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये गेल्या 24 तासात एकही रुग्ण आढळला नाही अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, छत्तिसगढ, गोवा, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश, केरळा, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि ओदिशा हे ते 13 प्रदेश आहेत.  दीव -दमण, सिक्किम, नागालँड आणि  लक्षद्वीप इथे आत्तापर्यंत एकही केस सापडली नसल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितले. देशात 130 जिल्हे हॉटस्पॉट असून 284 हॉटस्पॉट नसलेले जिल्हे तर 319 अप्रभावीत जिल्हे असल्याचं त्यांनी नमूद केले.  नवीन 821 समर्पित रुग्णालयात 1,50,059 खाटा (विलगीकरण कक्ष 1,32,219 आणि आयसीयू खाटा 17,840)  1,898 कोविड समर्पित आरोग्य केंद्रे 1,19,109 खाटा (विलगीकरण कक्ष 1,09,286 आणि आयसीयू खाटा 9,823) या तयारीनिशी  आता देशात उपलब्ध असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. 

राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांमध्ये मिळून 29.06 लाख पीपीई आणि 62.77 लाख N95 मास्कचे वितरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. 

राज्यांमधल्या कोविड -19  संबंधीत परिस्थिती आणि व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती प्रेझेन्टेशन झाल्यानंतर हर्षवर्धन यांनी सांगितले की राज्यांनी जास्त परिणामकारक सर्वेक्षण, रुग्णांचा कुठे संबंध आला याचा माग आणि आरंभीच्या पातळीवर रोगनिदान या बाबींवर  लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.  यामुळे मृत्यूदर कमी व्हायला मदत होईल. covid-19 रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांमध्ये,  तसेच गेल्या 14 दिवसांपासून ज्या जिल्ह्यात कोविड केसेस मिळालेल्या नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये IDSP नेटवर्क  आणि वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये यांच्या सहकार्याने    श्वसनसंस्थेशी संबंधित गंभीर आजार (SARI), / फ्ल्यू सारखे आजार (ILI)  या आजारांच्या रुग्णांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.  त्यामुळे एखाद्या न सापडलेल्या रुग्णाची सुरुवातीच्याच पातळीवर खात्री होऊन वेळच्यावेळी काळजी घेता येईल असेही त्यांनी नमूद केले .

संसर्ग पसरणार नाही याची खबरदारी, आरोग्य यंत्रणा व्यवस्थापनात पूर्व तयारी आणि प्रतिबंध या योगे आरोग्य सेवकांमध्ये संसर्ग पसरण्याचे प्रमाण कमी राखण्याची काळजी राज्यांनी घेतली पाहिजे, यावर हर्षवर्धन यांनी भर दिला. राज्यांनी केंद्राची नियमावली आणि सूचना यांचा अवलंब तळागाळापर्यंत  प्रामाणिकपणे राबवला पाहिजे, असेही ते म्हणाले.

खाजगी रुग्णालयांध्ये कोविड 19 विशेष व्यवस्थापन राबवताना घेतलेल्या खबरदारी बद्दल राज्यांनी यावेळी माहिती दिली. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशने खाजगी रुग्णालयांना भाडेतत्त्वावर कोविड आरोग्य व्यवस्थापन राबवण्यासाठी घेण्यात आले. उत्तर प्रदेशात ग्राम निगराणी समिती किंवा मोहल्ला निगराणी समिती स्थापन करून त्यायोगे परिणामकारक सर्वेक्षण आणि रुग्णांचा शोध घेणे यासारख्या गोष्टी राबवल्यबद्दल त्यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा आयुक्त तसेच विविध जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

येत्या काही दिवसात स्थलांतरित मजूर राज्यात येण्याचं प्रमाण वाढेल यावर बोलताना हर्षवर्धन यांनी ठराविक धोरण आखून बाधित रुग्णांवर उपचार करण्याची सूचना केली. परिणामकारक धोरणात परिक्षण, संस्थात्मक अलगीकरण आणि उपचार यांचाही आवश्यकता भासल्यास समावेश करावा लागेल. 

संसर्ग पसरलेल्या भागात  सर्वेक्षण करणाऱ्या पथकाने, सामाजिक स्वयंसेवकांनी वॉर्ड पातळीवर हातांची स्वच्छता, शारीरिक अंतर अशा प्रतिबंधात्मक उपायांबद्दल प्रबोधन करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं . यामुळे समाजात या आजाराबद्दल असलेली भीती दूर व्हायला मदत होईल.

लसीकरण, क्षयरोग तपासणी आणि उपचार, डायलिसिसवरील रुग्णांना रक्त संक्रमणाची सुविधा पुरवणे, कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचार, गरोदर स्त्रियांवरील उपचार अशासारख्या अनेक संबंधित नसलेल्या परंतु अत्यावश्यक आरोग्यसेवांमध्ये शिथिलता  येणार नाही याची  राज्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे, यावरही त्यांनी भर दिला. आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रेही रक्तदाब, मधुमेह आणि तीन प्रकारच्या कर्करोगांच्या चाचणीला वापरली जाऊ शकतात.  राज्यांना मोठ्या प्रमाणावरच्या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी टेलीमेडिसीन आणि टेलीकाऊन्सेलिंग सारख्या सुविधा लॉकडाऊन काळात वापरता येतील, असेही त्यांनी सुचवले. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा . राज्यांना 104 हेल्पलाइन नंबर वापरण्याचे तसेच त्यासोबत तक्रारींसाठी 1075 हा नंबर कोविडशिवाय इतर महत्वाच्या सेवांसाठी वापरता येईल आणि या सेवांची उपलब्धता तपासता येईल, असं त्यांनी सांगितलं.

हर्षवर्धन यांनी उत्तर प्रदेशातल्या आग्रा, कानपुर, मीरत ,सहरानपुर, गौतम बुद्ध नगर आणि लखनऊ तर  ओदिशा मधल्या बालेश्वर, गंजम आणि जाजपुर येथील जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि या जिल्ह्यातल्या covid-19 च्या व्यवस्थापनासंबंधी सविस्तर माहिती घेतली.

प्रीती सुदान सचिव(HFW) , राजेश भूषण OSD (HFW), वंदना गुरनानी AS & MD(NHM), मनोहर अगनानी, संयुक्त सचिव (HFW), एस के सिंग,संसंचा NCDC, अमित मोहन प्रसाद, मुख्य सचिव (आरोग्य), उत्तर प्रदेश, निकुंज धल मुख्य सचिव (आरोग्य),  ओदिशा, सौमित्र मोहन, मिशन संचालक  NHM पश्चिम बंगाल यांनी या बैठकीत भाग घेतला.


* * *

G.Chippalkatti/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1621939) Visitor Counter : 174