गृह मंत्रालय

सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने आणि शिफारशी पाठविण्यास 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ

प्रविष्टि तिथि: 04 MAY 2020 12:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मे 2020

 

देशाच्या एकतेला आणि अखंडत्वाला प्रोत्साहन देण्याच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल, भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावे सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करण्याचे योजिले आहे.

या क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरक योगदान देणाऱ्या तसेच सक्षम आणि अखंड भारताच्या मूल्यांना बळकटी देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था किंवा संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

पुरस्कारासाठी नामांकने / शिफारशी मागविणारी अधिसूचना 20 सप्टेंबर 2019 रोजी जारी करण्यात आली होती. या पुरस्काराशी संबंधित तपशील www.nationalunityawards.mha.gov.in येथे उपलब्ध आहेत.

या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन नामांकने मागविण्याची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

* * *

M.Jaitly/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1620827) आगंतुक पटल : 219
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , हिन्दी , Punjabi , English , Urdu , Manipuri , Bengali , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam