गृह मंत्रालय
कोविड-19 महामारी विरुद्धच्या लढाईतील कोरोना योद्धयांच्या अतुलनीय योगदान आणि त्यागाला केंद्रीय गृह मंत्र्यांनी केला सलाम
प्रविष्टि तिथि:
03 MAY 2020 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2020
कोविड-19 महामारी विरुद्धच्या लढाईत कोरोना योद्ध्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदान आणि त्यागाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्यांना सलाम केला.
अमित शहा यांनी ट्विट मध्ये म्हंटले की, “भारत आपल्या वीर कोरोना योद्ध्यांना सलाम करतो. मी तुम्हाला खात्री देतो की, मोदी सरकार आणि संपूर्ण देश तुमच्या सोबत उभा आहे. देशाला कोरोना मुक्त करून, आपल्याला या आव्हानांना संधीत रुपांतरीत करायचे आहे आणि निरोगी, समृद्ध व बळकट भारत निर्माण करून जगासमोर एक उदाहरण ठेवायचे आहे. जय हिंद!”
आज भारतीय सैन्य दलाने विविध मार्गांनी कोरोना योद्ध्यांचा गौरव केला. गृह मंत्र्यांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, देशाला कोरोना पासून मुक्त करण्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, निमलष्करी दले आणि इतर योद्ध्यांचे विविध प्रकारे सन्मान करणारे हे दृश्य हृदयस्पर्शी आहे. कोरोनाशी लढताना या योद्ध्यांनी दाखवलेले शौर्य नक्कीच वंदनीय आहे.”
कोरोना साथीच्या आजाराविरुद्ध लढणाऱ्या शूर सैनिकांना भारतीय सैन्य दलाने आज राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे पुष्पवंदना अर्पण केली. या संदर्भात शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले की, “ज्या शौर्याने भारत कोरोना विषाणू विरुद्धची लढाई लढत आहे ते खरोखरच प्रशंसनीय आहे. आज तिन्ही सैन्य दलांनी, या आजाराविरुद्ध लढणाऱ्या शूर सैनिकांना राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे पुष्पवंदना अर्पण केली. या कठीण काळात संपूर्ण देश या शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत उभा आहे.”
M.Jaitly/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1620645)
आगंतुक पटल : 218
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam