संरक्षण मंत्रालय

कोरोना विरूद्ध लढणाऱ्या योध्यांना  देशाची आदरांजली

Posted On: 02 MAY 2020 10:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मे 2020

 

भारत देश कोविड विषाणूचा कोविड योध्दांच्या मदतीने  यशस्वी मुकाबला करत आहे. भारतीय वायू दल  देशात आणि परदेशात माणसांची आणि मालाची वाहतूक करून या कार्यात आपले योगदान देत आहे.६००टनांपेक्षा जास्त वैद्यकीय सामानडॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तसेच  कोविडच्या चाचण्यांच्या प्रयोगशाळा उभारण्यासाठी सामानाची  नेआण यातून करण्यात आली. भारतीय वायुसेनेचे कर्मचारी  आपले कोविड विरोधातील हे योगदान देतच रहातील  भारतीय वायू दल आणि  त्यांच्या इतर सहकारी सेवा आपल्या विशिष्ट पद्धतीने  कोरोना विरोधात लढणाऱ्यांप्रती आपली क्रुतज्ञता व्यक्त करणार आहेत. आपल्या विशेष  हवाई प्रात्यक्षिकांद्वारे भारतीय वायू सेना या अचानक आलेल्या कोविडच्या संकटात  निस्वार्थीपणे  न थकता लढणाऱ्या शूर वीरांना सलामी देणार आहे.

दिनांक 3 मे रोजी अशी हवाई प्रात्यक्षिके  दिल्ली आणि एनसीआर भागात होणार आहेत.  भारतीय वायुसेनेतील शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच कोविड-१९ च्या काळात मदत करण्यासाठी वापरलेल्या  हवाई वाहनांचा यावेळी उपयोग केला जाईल.

ही हवाई मानवंदना  सकाळी दहा  ते साडेदहा यावेळेस राजपथावर  होणार असून त्यात सुखोई-30 MKI, MiG 29,आणि जँग्वार या विमाने सहभागी होतील.ही विमाने  दिल्लीतील आकाशात उडणार असून दिल्लीतील रहिवाशांना आपल्या घरांच्या गच्चीवरून पहाता येतील. त्याचप्रमाणें C-130 ही वाहतूक विमानेही यात सामील होतील आणि ती देखील दिल्ली आणि एनसीआर भागात दिसतील. पक्ष्यांचा विचार करून ही विमाने सुमारे ५००  ते १०००मीटर उंचीवरूनच उडतील.

याशिवाय हेलिकॉप्टरमधून .९ वाजता पोलिस युध्द स्मारकावर पुष्पवृष्टी करण्यात येईल, तसेच  दहा ते साडेदहा या वेळात  दिल्लीतील रूग्णांना  आराम पडावा म्हणून दिल्लीतील रुग्णालयांवरूनही पुष्पवृष्टी करतील. एम्स रूग्णालय,दीनदयाळ उपाध्याय रूग्णालय, जीटीबी रूग्णालय,लोकनायक रूग्णालय,राम मनोहर लोहिया रूग्णालय,सफदरजंग रूग्णालय, श्री. गंगाराम रूग्णालय, बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, मँक्स साकेत रोहिणी रूग्णालय, अपोलो इंद्रप्रस्थ रूग्णालय आणि आर्मी हाँस्पिटल  रीसर्च रेफरल रूग्णालयांची नावेही या यादीत आहेत.

 

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1620527) Visitor Counter : 140