रेल्वे मंत्रालय

मालवाहतूक कार्यात परिवर्तन घडवण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी घेतली लॉजिस्टिक उद्योगाच्या धुरिणांसमवेत बैठक


वाहतूक खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कल्पक आणि किफायतशीर उपाय हवा- पियुष गोयल

Posted On: 01 MAY 2020 9:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मे 2020

 

भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकविषयक घडामोडी आणि कार्यात परिवर्तन घडवण्यासाठी संभाव्य मार्ग आणि  साधने यावर चिंतन करण्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज लॉजिस्टिक उद्योगाच्या धुरिणांसमवेत बैठक घेतली. सुमारे तीन तास चाललेल्या या दीर्घ बैठकीत,मालवाहतूक अधिक प्रभावी आणि किफायतशीर राहण्यासाठी  धोरण विषयक सूचना उद्योग क्षेत्राकडून करण्यात आल्या.  

कोविड संकटाच्या काळात रेल्वेने बजावलेली  महत्वाची  भूमिका अधोरेखित करत या काळात जीवनावश्यक वस्तूंचा देशभरात पुरवठा करत रेल्वेने जीवनरेखा म्हणून भूमिका  बजावल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.या काळात मुख्य मार्गावरची संलग्नता वाढवणे, देखभालीची कामे यासारखी प्रलंबित कामे करण्यासाठी, त्याचबरोबर नादुरुस्त पूल दुरुस्त करणे किंवा पाडणे, पायाभूत सुविधा विस्तारणे यासाठी या काळाचा उपयोग केल्याचे त्यांनी सांगितले  

मालवाहतूक आणि लॉजिस्टिक व्यापारातून समोर आलेल्या विलक्षण संधींची दखल घेण्यात आली असून भविष्यात सेवा उंचावण्यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

रेल्वे मंडळाचेअध्यक्ष तसेच इतर अधिकारी आणि लॉजिस्टिक उद्योगातले धुरीण या बैठकीला उपस्थित होते.कालबद्ध  वितरण, मालवाहतूक दरांचे सुसूत्रीकरण, लॉजिस्टिक खर्च  अधिक किफायतशीर करण्याबाबत तसेच बंदरे आणि टर्मिनलवर मालाची चढ –उतार अधिक प्रभावी करण्याबाबत यावेळी भरीव सूचना करण्यात आल्या.  

रेल्वे मंत्र्यांनी या सूचनांचे स्वागत केले.कल्पकता ही गुरुकिल्ली असून वाहतूक खर्च कमी करण्याच्या दृष्टीने  कल्पक आणि किफायतशीर उपायाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane


(Release ID: 1620179) Visitor Counter : 205