गृह मंत्रालय

कोविड-19 साथीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बैठकीत लॉकडाऊन स्थितीचा व्यापक आढावा

प्रविष्टि तिथि: 29 APR 2020 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29  एप्रिल 2020

 

लॉकडाऊनच्या स्थितीचा व्यापक आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची आज बैठक झाली.

लॉकडाऊनमुळे आतापर्यंत मोठा लाभ  झाला असून परिस्थितीत सुधारणा झाली आहे. लॉकडाऊनमुळे आतापर्यंत झालेला फायदा टिकवून ठेवण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचे कसोशीने पालन करण्यात यावे,असे या  बैठकीत नमूद करण्यात आले.

कोविड-19  विरुद्ध लढा देण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना 4 मेपासून लागू होतील  त्याद्वारे अनेक जिल्ह्यांना अधिक दिलासा मिळेल. यासंदर्भातील अधिक माहिती आगामी दिवसांमध्ये दिली जाईल.

M.Jaitly/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1619501) आगंतुक पटल : 167
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Gujarati , Odia , Telugu , Kannada