पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद

Posted On: 28 APR 2020 10:49PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्यात आज दूरध्वनीद्वारे संभाषण  झाले.

कोविड-19 संदर्भातल्या सध्याच्या जागतिक परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली. जागतिक ऐक्य आणि सहकार्य,पुरवठा साखळी अबाधित राखणे आणि सहकार्यात्मक संशोधन कार्याचे महत्व यावर दोन्ही नेत्यांनी एकमत दर्शवले.

कॅनडात असलेल्या भारतीयांना विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना सहाय्य करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी कॅनडाच्या पंतप्रधानांचे आभार मानले. भारतात असलेल्या कॅनडाच्या नागरिकांना मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रशंसा करत  पंतप्रधान त्रुडो यांनी भारत सरकारचे आभार मानले.

औषध निर्मिती क्षेत्रातली भारताची उत्पादन क्षमता कॅनडासह जगभरातल्या  नागरिकांच्या सहाय्यासाठी उपलब्ध राहील असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

या महामारीविरोधातल्या लढ्यासाठीच्या जागतिक प्रयत्नात, विशेषतः कोविड-19 वर लस किंवा उपचारात्मक पद्धती शोधण्यासाठी, संशोधन आणि तंत्रज्ञानातल्या  सहकार्याद्वारे भारत आणि कॅनडा यांच्यातली भागीदारी अर्थपूर्ण योगदान देईल असे मत या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले.

 

B.Gokhale/ N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1619160) Visitor Counter : 227