नौवहन मंत्रालय
मनसुख मांडवीया यांनी भारतीय बंदरातील कर्मचाऱ्यांच्या बदलाबाबत विविध संघटनांशी संवाद साधला
मांडवीया यांनी परिस्थिती अनुकूल झाल्यावर अडकलेल्या भारतीय खलाशांना त्वरित बाहेर काढण्याचे आश्वासन दिले
Posted On:
28 APR 2020 3:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2020
केंद्रीय नौवहन राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीया यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भारतीय बंदरातील कर्मचाऱ्यांच्या बदला संदर्भात मालवाहू जहाज कंपन्या, जहाज कंपन्या, सागरी संघटना आणि खलाशी कामगार संघटनांशी संवाद साधला आणि सध्या कार्यरत असलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय समुद्रात अडकलेल्या भारतीय खलाशांचा परिस्थितीचा आढावा घेतला.

मांडवीया यांनी भविष्यातील निर्वासन योजनेसाठी परदेशात अडकलेल्या भारतीय खलाश्यांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. मांडवीया यांनी यावेळी विविध खलाशी संघटनांना, परिस्थिती अनुकूल झाल्यावर अडकलेल्या भारतीय खलाशांची त्वरित सुटका करण्याचे आश्वासन दिले. मंडावीया यांनी यावेळी सुलभ पुरवठा साखळीमध्ये खलाशांचे महत्त्व देखील मान्य केले. खलाशांना देखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे हे मांडवीया यांनी यावेळी मान्य केले आणि या कठीण आणि परीक्षेच्या काळत खलाशी करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक देखील केले.

मांडवीया यांनी यावेळी नौवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना भारतीय बंदरातील खलाशांची साईन ऑन आणि साईन ऑफची प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले.
या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये राष्ट्रीय भारतीय जहाज मालक संघटना (INSA), भारत-देशातील सगळ्या जहाज संघटनांची सागरी संघटना (MANSA), भारतीय खलाशी राष्ट्रीय कामगार संघटना (NUSI), भारतीय सागरी प्रतिष्ठान (IMF), भारतीय सागरी कामगार संघटना (MUI), जहाज मालक, जहाज व्यवस्थापक आणि एजंट सागरी संघटना इत्यादीचे प्रतिनिधी सहभागी होते.
* * *
M.Jaitly/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1618914)
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada