माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात कोणतीही कपात नाही, पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटने फेक न्यूजबाबत केला खुलासा

Posted On: 27 APR 2020 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2020

 

पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) फॅक्ट चेक युनिटने एका ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे की केंद्र सरकार, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात कोणतीही कपात करणार नाही. कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार अशा प्रकारच्या हालचालींची योजना आखत असल्याचा अंदाज वर्तविणाऱ्या  माध्यमांच्या अहवालावरील तथ्य या ट्विटमध्ये उघड करण्यात आले आहे.

 

दावा : हिन्दुस्तान अखबार ने रिपोर्ट किया है कि #Covid_19 के मद्देनज़र केंद्र सरकार के कर्मचारियों को एलटीसी/लीव एनकैशमेंट/ ओटीए/ मेडिकल जैसी सुविधाओं में कटौती का सामना करना पड़ेगा#PIBFactCheck:सरकार द्वारा ऐसा कोई प्रस्ताव नहीं है। मीडिया रिपोर्ट गलत और निराधार है। (1/2) pic.twitter.com/cEhM59Javq

— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 27, 2020

दुसर्‍या पोस्टमध्ये, फॅक्ट चेकने फेसबुकवरील एक अफवा उघडकीस आणली ज्यात आयसीएमआरने स्वस्त दराचा पर्याय उपलब्ध असताना जास्त किमतीला कोविड-19 चाचणी किट खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.आयसीएमआरने स्पष्टीकरण दिले की त्यांच्याकडे किट्सचे दर निश्चित आहेत आणि कोणत्याही कंपनीला  त्याहून स्वस्तात ही किट्स उपलब्ध करून देता येत असतील तर त्यांच्यासमोर पर्याय खुला आहे.

 

दावा: फेसबुक पोस्ट का दावा है #Coronavirus परीक्षण किट आईसीएमआर द्वारा बढ़े हुए मूल्य पर खरीदे गए#PIBFactcheck: परीक्षण किट के लिए (RT-PCR) 740-1150 रू और रैपिड टेस्ट किट (528-795 रू) का मूल्य निर्धारित किया है।
आईसीएमआर ने इससे सस्ती किट वाली किसी भी कंपनी को आमंत्रित किया है। pic.twitter.com/RyPnly1bM0

— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 27, 2020

समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या बनावट बातम्यांचे तथ्य जाणून घेण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीआयबीने समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांची शहानिशा करण्यासाठी एका समर्पित युनिटची स्थापना केली आहे. ‘पीआयबी फॅक्टचेक’ हे ट्विटरवरील एक सत्यापित हँडल आहे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग मेसेजेसवर सतत नजर ठेवते आणि बनावट बातम्यांच्या सत्यासत्यतेसाठी  त्याच्या सामग्रीचा सर्वसमावेशक आढावा घेते. याशिवाय पीआयबी_ इंडिया हँडल आणि पीआयबीचे विविध प्रादेशिक युनिट हँडल ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्विटर समुदायाच्या हितासाठी #PIBFactCheck हॅशटॅग वापरुन अधिकृत बातम्या प्रसारित करीत आहेत.

कोणतीही व्यक्ती एखाद्या बातमीची सत्यासत्यता पडताळणीसाठी मजकूर, ऑडिओ आणि व्हिडिओसह  पीआयबी फॅक्ट चेकवर पाठवू शकते. त्यासाठी सदर बातमी https://factcheck.pib.gov.in/ या पोर्टलवर किंवा व्हॉट्स अॅप +918799711259 वर किंवा ईमेलः pibfactcheck[at]gmail[dot]com यावर ऑनलाइन पाठविता येईल..पीआयबीच्या  https://pib.gov.in या संकेतस्थळावर देखील वरील तपशील उपलब्ध आहे.

* * *

M.Jaitly/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1618910) Visitor Counter : 130