PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग पुण्यात सात दिवस आहे जो उर्वरित देशापेक्षा किंचित जलद आहे: आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीम

अन्नसाखळीशी संबंधित महत्वाच्या गोष्टीच्या अभ्यासातून असे आढळले आहे की अत्यावश्यक अन्नधान्याची उपलब्धता वाढली आहे- उच्चाधिकार गट 5 चे अध्यक्ष

Posted On: 27 APR 2020 7:50PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, April 27, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from field offices, and Fact checks undertaken by PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  कोविड-19 चा सामना करण्यासंदर्भात पुढील नियोजन आणि उद्‌भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधलेला हा चौथा संवाद होता. गेल्या दीड महिन्यांत हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात देशाला यश आले असून लॉकडाऊनचे  सकारात्मक परिणाम झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. वेळेवर केलेल्या उपाययोजनांमुळे भारत अनेक लोकांचे रक्षण करू शकला आहे. त्याचबरोबर त्यांनी पूर्वसूचना देखील दिली कि विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही आणि सतत सतर्क राहणे सर्वाधिक महत्वाचे आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी कोविड-19  घडामोडींवरील माहिती दिली. 

अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि लॉजीस्टिक्सच्या प्रगतीबाबत अधिकारप्राप्त गट 5 चे अध्यक्ष परमेस्वरण अय्यर यांनी सादरीकरण केले.

 • आंतर मंत्रालयीन केंद्रीय टीमने पिंपरी-चिंचवड, हरणवाडी आणि बारामती प्रतिबंधित क्षेत्रांना भेटी दिल्या त्याचबरोबर त्यांनी स्थलांतरित मजुरांची निवारा क्षेत्रे, भाजी मंडई, रेशन दुकाने, जिल्हा परिषद कंट्रोल रूम, नगर निगम वॉर्डरूम आणि हॉस्पिटल्सना देखील भेटी दिल्या. त्यांच्या असे लक्षात आले की रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग पुण्यात सात दिवस आहे जो उर्वरित देशापेक्षा किंचित जलद आहे. तसेच उर्वरित देशांमध्ये दर 23 नमुन्यांमध्ये 1 जण पॉझिटिव्ह आढळत असताना पुण्यामध्ये दर नऊ नमुन्यांमध्ये एक जण पॉझिटिव्ह आढळतो आहे.
 • केंद्रीय टीमने सूचना केली की ज्यांना जास्त धोका आहे अशा लोकांना ओळखले जावे आणि चाचण्या तसेच निरीक्षण वाढविण्यात यावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा वेगही वाढविण्यात यावा. झोपडपट्टी, बाजार याठिकाणी वाराचे नियम घालून दिले जावेत. झोपडपट्टी भागासाठी संस्थात्मक विलगीकरणवर भर दिला जावा. बरेच डॉक्टर, पॅरामेडिकल, पोलीस आणि आपत्कालीन सेवा कर्मचारी हे पॉझिटिव्ह आढळले आहेत ही चिंतेची बाब आहे कारण हे लोक दररोज खूप लोकांच्या संपर्कात येत असतात. केंद्रीय टीमने  लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. या टीमने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
 • भारतात  कोविड-19 चे 27,892 रुग्ण; रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -20,835. गेल्या 24 तासांत : 48 जणांचा मृत्यू, 381 रुग्ण बरे झाले. रुग्णांची संख्या--1396 एकूण मृत्यूसंख्या-872 आतापर्यत 6184 रुग्ण बरे झाले, रुग्ण बरे होण्याचा दर 22.17% - आरोग्य मंत्रालय
 • गेल्या 28 दिवसांत देशातील 16 जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, या यादीत 3 नव्या जिल्ह्यांची भर पडली आहे. 25 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातल्या 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही
 • पंतप्रधानांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ  कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. सजग रहे, सचेत रहे असा संदेश त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
 • संक्रमणाची साखळी तोडायला हवी,विशेषतः जे जिल्हे रेड, ऑरेंज झोन मध्ये आहेत, तिथे संक्रमण थांबवणे आवश्यक आहे, असे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. ग्रीन झोन मधल्या जिल्हा प्रशासनाने निरीक्षणावर लक्ष केंद्रित करत, नवे रुग्ण येणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.
 • इतर आरोग्य सुविधा- जसे की डायलिसिस, इतर आजारांवरचे उपचार यात शिथिलता यायला नको. आपल्या पारंपरिक/ नेहमीच्या वैद्यकीय व्यवस्था सुरळीत कार्यरत असायला हव्या. रेड झोन मधून ऑरेंज आणि ऑरेंज मधून ग्रीन झोन मध्ये येणे हा आपला 'मंत्र' असावा, असे पंतप्रधान म्हणाले
 • आपली लढाई आजाराशी आहे, आजारी व्यक्तीशी नाही. या रोगाविषयीच्या भयगंडामुळे अनेकदा रुग्ण आजार लपवतात आणि वेळेवर उपचार घेत नाहीत. यामुळे केवळ रुग्णाचेच नव्हे तर त्याच्या कुटुंबाची आणि संपूर्ण समाजाची हानी होते
 • आपण चुकीची आणि भीती पसरेल अशी माहिती देणे टाळावे. कुठलाही समुदाय किंवा भागाला कोविड-19 चे प्रसारक असा ठपका ठेवला जाऊ नये. विशेषतः आरोग्य कर्मचारी, स्वच्छता सेवक  आणि  पोलीस आपली मदत करण्यासाठी काम करत आहेत, त्यामुळे त्यांना लक्ष्य केले जाऊ नये.
 • पहिल्या फळीत काम करणारे कार्यकर्ते आपले रक्षक आणि नायक आहेत. रुग्णांचे आणि या आजारापासून सर्वांचे रक्षण करण्यासाठी ते निःस्वार्थपणे काम करत आहेत. आपला समाज सुरक्षित राहावा यासाठी त्यांनी आपले आयुष्य धोक्यात घातले आहे
 • कोविड-19 हल्ला करण्यापूर्वी वर्ण, धर्म, रंग, जात, पंथ, भाषा किंवा सीमा काहीही बघत नाही. पंतप्रधानांच्या शब्दांचे स्मरण करत, आपण या आजाराचा प्रतिकार करतांना आपले ऐक्य आणि बंधुभाव सर्वोच्च ठेवायला हवा
 • अत्यावश्यक वस्तू आणि लॉजीस्टिक्स च्या पुरवठा साखळीविषयक प्रगतीबाबत उच्चाधिकार गट 5 चे अध्यक्ष परमेस्वरण अय्यर यांनी सादरीकरण केले.
 • अन्न आणि औषध सामग्रीच्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. भारतीय रेल्वेने असामान्य कामगिरी केली आहे. बंदरांकडून होत असलेल्या वाहतुकीत वाढ झाली आहे. 30 मार्च रोजी 61% बाजारपेठा कार्यरत होत्या आता त्यात वाढ होऊन 79% बाजारपेठा कार्यरत झाल्या आहेत.
 • अधिकारप्राप्त गट 5 ने धोरण आणि अंमलबजावणीतले अडथळे राज्य सरकार आणि इतर हितसंबंधियांसोबत काम करुन दूर केले आणि त्यानुसार शिफारसी केल्या. आम्ही महत्वाच्या निदर्शकांकडे लक्ष ठेवून सर्वोत्तम उपाययोजनाही सांगतो आहोत.
 • अधिकारप्राप्त गट 5 च्या अध्यक्षांनी वाहने, कामगार आणि ट्रक चालक यांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट मुद्यांबाबतीत निर्देश दिले. त्यावेळी या गटाने लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक अतिशय सहजतेने करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
 • भारतीय रेल्वे, पोस्ट ऑफिस, IRCTC, आणि लाईफलाइन उडान या संस्था सर्वांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, यासाठी  अहोरात्र काम करत आहेत, - अधिकारप्राप्त गट 5 चे अध्यक्ष
 • तेलंगणमधील अंगणवा़डी शिक्षिका स्थलांतरित मजुरांना जेवण देत आहेत. झारखंडमध्ये ताज्या भाज्यांचा घरपोच पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. भारतीय हवाई दलाच्या च्या माध्यमातून मालदीवला अनेक टन औषधांचा पुरवठा करण्यात आला.- अशा प्रकारे मदतकार्य सुरु आहे.
 • किमती स्थिर ठेवल्या जात आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत  मोठया प्रमाणावर वाटप सुरु आहे. दररोज 1.5 कोटी लोकांना शिजवलेले अन्न वितरित केले जाते.
 • अन्नसाखळीशी संबंधित महत्वाच्या गोष्टीच्या अभ्यासातून अत्यावश्यक अन्नधान्याची उपलब्धता वाढली आहे- अधिकारप्राप्त गट 5 चे अध्यक्ष
 • अन्न उत्पादनाचा पुरवठा करणारी राज्ये आणि या उत्पादनांची गरज असलेली राज्ये  यांना परस्परांशी जोडून कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने अधिकारप्राप्त गट- 5 अतिरिक्त उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी एका पोर्टलचे परिचालन करत आहे
 • रॅपिड टेस्टिंग किट्सच्या बाबतीतली संवेदनशीलता आणि विशिष्ट गुणधर्म लक्षात घेऊन  खरेदीसाठी निविदेला ICMR ने  अंतिम स्वरुप दिले. मात्र, जेव्हा  तक्रारी आल्या, तेव्हा त्यांची त्वरित नोंद घेत, सर्व ऑर्डर रद्द केल्या. कोणत्याही विक्रेत्याला पैसे दिले नाही.
 • ज्या विक्रेत्यांनी चुकीची आकडेवारी दिली आहे किंवा ज्यांची उत्पादने अपेक्षित काम करु शकलेली नाही, त्या सर्वांविरोधात आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे- रॅपिड अँटीबॉडी चाचण्यांच्या किमतीबाबत सुरु असलेल्या वादावर आरोग्य मंत्रालयाने वरील स्पष्टीकरण दिले.
 • जिथे लोकसंख्येची घनता अधिक आहे, तिथे आव्हानेही मोठी आहेत. कंटेंनमेंट धोरणानुसार, कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय पथके राज्य सरकार मधल्या उच्चस्तरीय व्यक्तींसोबत चर्चा करत आहे. आम्हाला सकारात्मक निकालही मिळत आहेत- कोविड-19 च्या मुंबई, पुण्यातल्या प्रसाराबाबत आरोग्य मंत्रालयाने वरील स्पष्टीकरण दिले
 • ICMR कडे RT-PCR चाचण्या करण्यासाठी या संदर्भातील आमच्या धोरणानुसार पुरेशा प्रमाणात  टेस्टिंग किट्स आहेत. त्यातही आम्ही आवश्यक असलेल्या भौगोलिक विभागणीवर भर देऊन प्रत्येक विभागात याच्या उपलब्धतेवर भर दिला आहे

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

  इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्स

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले की शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील परिस्थिती सुधारत आहे. त्या म्हणाल्या शहरातील 1036 प्रतिबंधित क्षेत्र मधील 231 मध्ये गेल्या चौदा दिवसात नवीन कोविड-19 केसची नोंद झालेली नाही. तसेच पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 53 पत्रकारांपैकी 31 जणांना दोनदा चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना गृह विलगीकरनात 14 दिवस ठेवले जाईल.

 

***

DJM/RT/MC/SP/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1618753) Visitor Counter : 52