कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कोविड-19 विरोधातल्या लढाई बाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केली माजी भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा
Posted On:
25 APR 2020 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2020
केंद्रीय राज्यमंत्री ( स्वतंत्र खाते), ईशान्य राज्ये विकास(DoNER) आणि राज्य मंत्री प्रधानमंत्री कार्मिक कार्यालय, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणूऊर्जा आणि अवकाश डॉ.जितेंद्र सिंग यांनी आज माजी भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोविड-19 च्या लढाई विरोधात आणि टाळेबंदी शिथिल करण्याच्या योजनेवर सविस्तर चर्चा केली.
सुधीर भार्गव, रामा सुंदरम, राकेशकुमार गुप्ता, सत्यानंद मिश्रा, पी.पन्नीरवेल, के.ईएपन, या माजी आय ए एस अधिकारी, या निवृत्त माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि संगीत गुप्ता, शीला संगवान माजी प्रशासकीय महसूल अधिकाऱ्यांना, डॉ. जितेंद्र सिंग यांनी दीड तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरकारच्या या महामारीच्या विरोधात आतापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. "सुरवातीपासूनच सरकारने अनेक योजनांचा प्रारंभ करून कित्येक विकसित देशांपेक्षाही या महामारीविरूध्दच्या लढाईत चांगली कामगिरी केली आहे," असे डॉ. जितेंद्र सिंग यावेळी म्हणाले.
या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सरकारने महामारीचा मुकाबला करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी टाळेबंदी नंतर कोणकोणत्या गोष्टी करता येतील, याबाबत आपले विचार मांडले.या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधे अधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने टाळेबंदी उठविणे,ई ऑफिस पध्दतीने कार्यालयांचे तंत्रज्ञानाने व्यवस्थापन करणे, 'क'जीवनसत्वाचा वापर करून प्रतिबंधक शक्ती वाढवणे, महसूल वाढवून अर्थव्यवस्थेला गती देणे, गरीब नागरिकांना आर्थिक संरक्षण देणे, ऑनलाईन पध्दतीने शिक्षण आणि परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पार पाडणे, स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी पोचण्यासाठी मदत करणे, तसेच मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी रोगनिदान चाचणी यंत्रे आणि लस बनविणे, या सर्व बाबतीत महत्वपूर्ण चर्चा केली.
करोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी अशाप्रकारे चर्चा करून माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग भविष्यातही केला जाईल, असे सांगून डॉ. जितेंद्र सिंग यांनी या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे
आभार मानले.
* * *
G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1618317)
Visitor Counter : 200
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam