ऊर्जा मंत्रालय
लॉकडाऊनमध्येही एनटीपीसीकडून अखंड विद्युतपुरवठा
सर्व केंद्रांमध्ये लॉकडाऊन आणि सामाजिक सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन
एनटीपीसी विंध्याचलने 13 एप्रिल 2020 रोजी 100 टक्के पीएलएफ मिळविले
Posted On:
25 APR 2020 9:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2020
ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) असलेली एनटीपीसी ही भारतातील सर्वांत मोठी वीज उत्पादक असून कोरोना साथीच्या काळातही अखंड वीजपुरवठ्याचे काम करीत आहे. सध्याच्या करोना महामारीमुळे चालु लॉक डाऊन काळात, ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक महारत्न कंपनी ऊर्जा पुरविण्यात सक्रीय झाली असुन सर्वोत्तम पातळीवर कामगिरी बजावत असल्याचे नवीनआणि नूतनीकरणयोग्य ऊर्जामंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री आर. के. सिंह (आय/सी) यांनी सांगितले
कोविड-19 संकटाने वीज उपयोगितेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अर्थव्यवस्थेतील बऱ्याच क्षेत्रांचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी वीजेचा उपयोग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एनटीपीसी देखील अतिशय कार्यक्षमपणे सततच्या वीज निर्मितीसाठी कोळसा पुरविण्याचे व्यवस्थापन करीत आहे.
जरी एनटीपीसीचे कर्मचारी अग्रभागी राहून चोखपणे चोवीस तास वीज पुरवठा सुनिश्चित करत असले, तरी एनटीपीसीमध्ये लॉकडाऊन संदर्भातील नियमावली, मार्गदर्शकतत्वे आणि सामाजिक सुरक्षित अंतराबाबतचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. वीज उत्पादनाच्या पलिकडे जाऊन, या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने (पीएसयू) समाज कल्याणाच्यादृष्टीने वंचित विभाग आणि स्थलांतरित कामगारांना अन्नधान्य आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यामध्ये मोठा सहभाग नोंदविला आहे. कोविड-19 विरोधात लढा देताना देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पर्याप्त प्रमाणात वीज पोहोचावी, याबाबतच्या घडामोडींवर एनटीपीसीचे व्यवस्थापन बारकाईने लक्ष ठेवून आहे.
एनटीपीसी वीजकेंद्रांच्या ताफ्यात विंध्याचल हे देशातील सर्वांत मोठे वीज केंद्र आहे, ज्याने 13 एप्रिल 2020 रोजी 100 टक्क्यांपेक्षा जास्त पीएलएफ मिळविला आहे आणि लॉकडाऊनचा काळ असतानाही भारतातील पहिले अल्ट्रा सुपरक्रिटिकल वीज केंद्र, एनटीपीसी खरगोनचे दुसरे 660 मेगावॉटचे व्यावसायिक केंद्र या काळात सुरू झाले जे लॉकडाऊनच्या काळातही एनटीपीसीच्या उत्कृष्टतेची वचनबद्धता सिद्ध करते.
एकूण स्थापित 62110 मेगावॉट क्षमता असणाऱ्या एनटीपीसी ग्रुपकडे 70 वीज केंद्र आहेत यापैकी 24 कोळसा, 7 संयुक्त वायू / द्रवरूपातील इंधन, 1 जल विद्युत, 13 नूतनीकरण योग्य आणि 25 संयुक्त उपक्रमांतर्गत असणारे ऊर्जा केंद्र आहेत.
* * *
B.Gokhale/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1618316)
Visitor Counter : 255