रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरात आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रक / लॉरी चालकांसाठी काय करावे आणि काय करू नये यासंबंधी अॅनिमेशन व्हिडीओ चित्रण केले उपलब्ध
लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक वस्तू आणि औषधे यांची ने-आण करणाऱ्या ट्रक / लॉरी चालकांचा आदर करण्याचे केले आवाहन
Posted On:
25 APR 2020 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2020
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रक / लॉरी चालकांसाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती देणारा अॅनिमेशन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. कोविड -१९ ला आळा घालण्यासाठी सरकारला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागला असताना या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची वाहतूक करून जीवन सुकर करणाऱ्या ट्रक / लॉरी चालकांचा आदर आणि त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन या अॅनिमेशनमध्ये केले आहे.
आकर्षक ग्राफिक ऍनिमेशन स्वरूपात काय करावे आणि काय करू नये याबाबत सूचनांमध्ये पुढील उल्लेख आहे-
: कोरोना विषाणू आजारापासून (कोविड-19) सुरक्षित रहा
: लॉकडाउन दरम्यान आवश्यक वस्तू आणि औषधांची पुरवठा साखळी कायम ठेवणाऱ्या ट्रक /लॉरी चालकांचा आदर करा आणि त्यांना सहकार्य करा
: स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करा आणि तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करा
काय करावे:
- वैयक्तिक स्वच्छता राखा
- जेव्हा शक्य असेल तेव्हा साबण आणि पाण्याने आपले हात किमान २० सेकंद धुवा
- वाहन चालवताना / वाहनातून बाहेर पडताना मास्कचा वापर जरूर करा
- मास्क वापरल्यानंतर तो साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून वाळवायला ठेवा
- नेहमी आपल्या वाहनात सॅनिटायझर ठेवा
- वाहन चालवण्यापूर्वी किंवा त्यातून बाहेर पडण्यापूर्वी 70% अल्कोहोल -आधारित हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करा
- नियमांनुसार वाहनात सहाय्यक आणि चालकाव्यतिरिक्त अतिरिक्त प्रवाशांसह प्रवास करू नका
- शारीरिक अंतर राखा
- चेक पोस्ट/लोडिंग-अनलोडिंग पॉईंट / रेस्टॉरंट या ठिकाणी लोकांशी थेट संपर्क टाळा
- दररोज आपले वाहन स्वच्छ करा
काय करू नये:
- फाटलेले / जुने आणि / किंवा इतरांनी वापरलेले मास्क वापरू नका
- एकापेक्षा अधिक सहाय्यकांना आपल्याबरोबर आपल्या वाहनातून प्रवास करू देऊ नका
- सामाजिक मेळावे टाळा
- आपल्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका
चला, आपण सर्वजण एकमेकांची काळजी घेऊया आणि कोविड -१९ चा प्रसार रोखूया
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1618292)
Visitor Counter : 225
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam