संरक्षण मंत्रालय
भारतीय सशस्त्र दलाच्या कार्यप्रणालीचा आणि कोविड-19 विरोधी लढ्यातील सज्जतेचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आढावा
Posted On:
24 APR 2020 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2020
भारतीय सशस्त्र दलाच्या कार्यप्रणालीचा आणि कोविड-19 विरोधी लढ्यातील सज्जतेविषयी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व प्रमुख कमांडर सोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज आढावा घेतला.
संरक्षण विभाग प्रमुख आणि सैन्य व्यवहार विभागाचे सचिव जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदौरिया, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि सचिव (संरक्षण वित्त) गार्गी कौल यांनी संरक्षणमंत्र्यांसोबत या परिषदेत भाग घेतला.
स्थानिक नागरी प्रशासनास सशस्त्र सेनेतर्फे करण्यात येत असलेल्या मदतीसाठी आणि कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात सशस्त्र सेनेच्या उपाययोजनांच्या सज्जतेविषयी संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
कोविड- 19 विरुद्धच्या लढ्यासाठी सशस्त्र दलाने उपाययोजना करण्याबरोबरच या परिस्थितीचा शत्रूला गैरफायदा घेता येऊ नये यासाठी सज्ज राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर आर्थिक बोजा लक्षात घेता होणारी नासाडी टाळून आर्थिक संसाधने खर्च करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी सैन्य दलाला दिले.
सैन्य दलांच्या संयुक्ततेच्या गरजेवर जोर देत संरक्षणमंत्र्यांनी मुख्य कमांडरना सांगितले की, लॉकडाउन संपल्यानंतर लवकरात लवकर करता येणारी कामे ओळखून त्यांना प्राथमिकता द्यावी जेणेकरून अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनास मदत मिळेल.
सैन्यदलांमध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या विविध उपायांची तसेच स्थानिक नागरी प्रशासनास केलेल्या मदतीविषयी सर्व प्रमुख कमांडरनी यावेळी संरक्षणमंत्र्यांना माहिती दिली. यामध्ये कोविड -19 विरोधात राबविलेली प्रमाणित कार्यप्रणाली, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तसेच इतर संस्थांद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिष्टाचार आणि कवायतींमध्ये योग्य त्या बदलांचा समावेश आणि त्या कमांडरच्या अधिकारक्षेत्रात राहणाऱ्या माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे यांचा समावेश होता.
रुग्णालयांच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी तसेच आवश्यक वैद्यकीय पुरवठा वेळेवर होण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या आपत्कालीन आर्थिक शक्तींच्या हस्तांतरणाचे कमांडर्सनी कौतुक केले.
अतिरिक्त मनुष्यबळ वाढवून, त्यांना कोविड-19 विरोधात लढण्यासाठी प्राथमिक प्रशिक्षण देऊन सशस्त्र दलाने या महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी समग्र पद्धतीने त्यांच्या जबाबदारीचे भान राखले आहे.
सैन्यासाठी आणि स्थानिक नागरी प्रशासनाच्या वापरासाठी अलगीकरण, विलगीकरण कक्ष स्थापन केल्याची माहिती या कमांडर्सनी यावेळी दिली. नागरी प्रशासनाने विनंती केल्यास आवश्यक त्या सेवा स्थानिक पातळीवर देण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली आहे.
खालील कमांडमधील अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले:
नॉर्दन कमांड, उधमपूर; ईस्टर्न कमांड, कोलकाता; सदर्न नौदल कमांड, कोची; वेस्टर्न नौदल कमांड, मुंबई; सदर्न कमांड, पुणे; साऊथ -वेस्टर्न कमांड, जयपूर; वेस्टर्न एअर कमांड, दिल्ली; ईस्टर्न नौदल कमांड, विशाखापट्टणम; सेंट्रल एअर कमांड, अलाहाबाद; साऊथ-वेस्ट एअर कमांड, गांधीनगर; सदर्न एअर कमांड, त्रिवेंद्रम; सेंट्रल कमांड, लखनऊ; अंदमान आणि निकोबार कमांड, पोर्ट ब्लेअर
B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1617881)
Visitor Counter : 197
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam