माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मंत्रालये बंद करण्याचा सरकारचा आदेश नाही; वृत्त असत्य असल्याचे पीआयबीच्या 'फॅक्ट चेक'मधून उघड

Posted On: 21 APR 2020 10:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 एप्रिल 2020

 

अपप्रचार करणाऱ्या बनावट वृत्ताविरोधात पत्र सूचना कार्यालयाने सुरु केलेल्या फॅक्ट  चेक (सत्यता  पडताळणी) या मोहिमे अंतर्गत आज माध्यमातून फिरणाऱ्या अनेक बनावट वृत्तामधला फोलपणा उघड करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने ”से नमस्ते” या नावाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिग ॲपची  बीटा आवृत्ती आणली असून लवकरच हे ॲप सुरु होणार असल्याचे वृत्त  एका महत्वाच्या वेब पोर्टलने दिले. सरकारने असे  कोणतेही  ॲप जारी केले नाही, असे पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेकद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या  ॲपला  केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे असा गैरसमज करून कोणीही हे ॲप डाऊनलोड करू नये, या उद्देशाने ही माहिती देण्यात आली आहे. 

https://twitter.com/PIBFactCheck/status/1252603481136877568?s=20

लॉक डाऊन मुळे रेल्वे मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि निवृत्तीवेतनात कपात करण्याचा विचार करत आहे, या वृत्ताचे,आधीच्या पोस्टची पुनरावृत्ती करत फॅक्ट  चेकने, सोशल मिडीयावर पुन्हा एकदा खंडन केले आहे. हे वृत्त खोडसाळ आहे. अशी कपात करण्याचा मंत्रालयाचा कोणताही विचार नाही,  याचा पुनरुच्चार पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट   चेकद्वारे करण्यात आला आहे.     

 

https://twitter.com/PIBFactCheck/status/1252541165083127813?s=20

केंद्र सरकारने सर्व मंत्रालये बंद करण्याचे निर्देश दिले आहेत असा दावा करणारे  एका वृत्त वाहिनीच्या स्क्रीनवर दाखवलेले वृत्त सोशल मिडीयावर पसरले आहे.सरकारकडून असे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. वाहिनीने ही बातमी मागे घेत त्यात सुधारणा केली आहे. 

 

https://twitter.com/PIBFactCheck/status/1252468471029395456?s=20

पत्र सूचना कार्यालयाची प्रादेशिक कार्यालये, राज्य स्तरावरच्या बनावट बातम्यांना आळा घालण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. हिमाचल प्रदेश मध्ये पंजाब मधल्या एका समुदायाच्या दुधवाल्यांना परवानगी नाही अशा अर्थाचे वृत्त एका प्रमुख वृत्त पोर्टलवर देण्यात आले होते. पत्र सूचना  कार्यालयाच्या सिमला इथल्या कार्यालयाने,हिमाचल प्र्देश मधल्या उना जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रासह ट्वीट जारी करत  ही बातमी असत्य असल्याचे सिध्द केले.

 https://twitter.com/PIBShimla/status/1252191586567372801?s=20

 

लॉक डाऊन मुळे, अन्न मिळत नसल्यामुळे बिहार मधल्या जेहानाबाद इथे मुलांना बेडूक खावे लागत असल्याचा खोडसाळ व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात फिरत होता. पत्र सूचना कार्यालयाने  त्यातला फोलपणा उघड केला आहे. या मुलांच्या कुटुंबाकडे पुरेसे अन्न असल्याचे जिल्हा प्रशासनाणे केलेल्या  चौकशीत आढळून आले.   

https://twitter.com/PIBFactCheck/status/1252169585832255488?s=20

अशाच प्रकारे  अरुणाचल प्रदेश मध्ये अन्नाच्या  तुटवड्यामुळे लोक साप खात आहेत असा दावा करण्यात आला होता. पत्र सूचना कार्यालयाच्या गुवाहाटी इथल्या प्रादेशिक कार्यालयाने, राज्य सरकारचा हवाला देत राज्यात गेले तीन महिने अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट करून यासंदर्भात देण्यात आलेले वृत्त असत्य असल्याचे स्पष्ट केले. राज्याला नियमित धान्य पुरवठा होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.   

https://twitter.com/PIB_Guwahati/status/1252570210382602240?s=20

 

पूर्वपीठीका:

सोशल मिडीयावर पसरणाऱ्या बनावट वृत्ताना आळा घालण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टिपण्णी नुसार पत्र सूचना कार्यालयाने सोशल मिडीयावरच्या अशा अफवांचा फोलपणा उघड करून त्याचे  खंडन करण्यासाठी विशेष युनिट स्थापन केले आहे. ‘PIBFactCheck’ या ट्वीटर हॅन्डल द्वारे अशा वृत्तांवर लक्ष ठवून त्यासंदर्भातल्या आशयाचा सर्वंकष आढावा घेऊन अशा बनावट वृत्ताबाबतचा फोलपणा उघड करण्यात येतो. याशिवाय,पीआयबी इंडिया हॅन्डल आणि पीआयबी प्रादेशिक कार्यालय ट्वीटर हॅन्डलवर अधिकृत माहिती हॅश टेग #PIBFactCheck चा वापर करून जनतेच्या हितासाठी देण्यात येते. कोणतीही व्यक्ती पीआयबीच्या फॅक्ट चेकसाठी कोणताही सोशल मिडिया संदेश, ध्वनीफित  किंवा ध्वनीचित्रफित पाठवून त्याची सत्यता तपासू शकते. 

त्यासाठी https://factcheck.pib.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन किंवा +918799711259 या व्हाटस ऐप क्रमांकावर अथवा pibfactcheck[at]gmail[dot]com. या ई मेल पाठवता येईल. https://pib.gov.in या पीआयबी च्या संकेतस्थळावरही तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.  

WhatsApp Image 2020-04-21 at 8.38.39 PM.jpeg

* * *


U.Ujgare/N.Chitale/D.Rane


(Release ID: 1617079) Visitor Counter : 300